facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / अग्निशमन विभागासाठी साहित्य खरेदी रेंगाळली

अग्निशमन विभागासाठी साहित्य खरेदी रेंगाळली

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – अग्निशमन विभागासाठी ५० लाखांच्या साहित्यखरेदीचा प्रस्ताव मंजूर करूनही केवळ प्रशासकीय चालढकलीमुळे प्रत्यक्षात खरेदीस विलंब होत आहे. त्यामुळे अग्निशमन विभागाचे बळकटीकरणाचे काम रखडले आहे. धक्कादायक म्हणजे निधी उपलब्ध होऊनही जागेअभावी मंजूर करण्यात अलेल्या नवीन उपकेंद्राला सुरुवात झालेली नाही.

जळगाव शहराचा वाढता विस्तार पाहता अग्निशमन दलात कुठल्याही सुधारणा न झाल्याने सध्या पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या जळगावची आगीपासून सुरक्षा करण्याची जबाबदारी केवळ ५५ कर्मचाऱ्यांसह चार फायरफायटरवर आहे. त्यातील दोन फायटर आलटून-पालटून नादुरूस्त असतात. महापालिकेकडे मिनी फोम टेंडर फायटर असले, तरी त्याची क्षमता ही केवळ ३०० लिटर इतकीच आहे. अग्निशमन निधीमधून महापालिकेने ५० लाख रुपयांचे साहित्य घेऊन अग्निशमन विभाग अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ३ ते ४ हजार लिटरची क्षमता असलेले मोठे फोम फायटर, २ वॉटर टँकर, २ फायर फायटर व रेक्स्यू वाहन आदींच्या खरेदीचा तीन कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. पेट्रोलियम पदार्थ, तेल व केमिकला आग लागल्यास पाणी त्यापेक्षा जड असते. त्यामुळे आग विझवणे अवघड होते. त्यावर फोम (फेस) मारल्याने ही आग आटोक्यात येते. विमानतळावर फोम टेंडर फायटर असल्याशिवाय विमानाचे लॅण्डिंग होत नाही. साहित्य खरेदीच्या प्रस्तावास अग्निशमन महासंचालक, जिल्हाधिकारी व महासभेने मान्यता दिली आहे, तरीही दीड वर्षांपासून प्रशासकीय उदासिनतेमुळे खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *