facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / आरोपींच्या मोबाइल डेटाची तपासणी

आरोपींच्या मोबाइल डेटाची तपासणी

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – पाळा येथील निंबाजी कोकरे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या मोबाइल डेटाची तपासणी केली जात आहे. मुख्य आरोपी इत्तुसिंग काळुसिंग पवार याच्याकडून पोलिसांनी छोटा कॅमेराही जप्त केला आहे. त्याच्या उमरा येथील घराची झाडाझडती पोलिसांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, फरार मुख्याध्यापक आणि लिपिकाचा शोध अजूनही लागलेला नाही.

सध्या दिवाळीच्या सुट्या असल्याने हलखेडा येथील पीडितेच्या माहितीशी सुसंगत असलेल्या विद्यार्थिनींच्या घराचे पत्ते शोधून विचारपूस केली जात आहे. मुख्य आरोपी इत्तुसिंग पवारने कबुलीनामा दिल्याने तपासाला वेग आला आहे. त्याच्याजवळील फोटो किंवा व्हिडीओ क्लिप‌िंग काढणाऱ्या साहित्याचा तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या कॅमेऱ्यात आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडीओ आढळून आलेला नाही. मोबाइल साधा असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असले तरी आणखी एक मोबाइल त्याच्याकडे असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्या दिशेने पोलिस चौकशी करीत आहेत. आश्रमशाळेतील शौचालयांना दरवाजे नाहीत. आंघोळीच्या वेळीही मुलींची अश्लील चित्रफित तयार करून इत्तुसिंग ब्लॅकमेलिंग करीत असावा, असा संशयदेखील तपास अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे इतर आरोपींच्या मोबाइल डेटातून क्लिपिंगसारखा पुरावा हाती लागण्याच्या दृष्टीनेदेखील शोधमोहीम राबविण्यात येत आहे. मुख्य आरोपीच्या कबुलीनाम्याने अन्य आरोपींच्या सहभागाच्यादृष्टीने मोबाइल डेटा किंवा तत्सम स्वरुपातील क्लिप भक्कम पुरावा ठरू शकतो. मात्र, यांसदर्भात फोटो किंवा क्लिप मिळाल्याच्या संदर्भात अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *