facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / कविता आदिवासी विकास विभागात

कविता आदिवासी विकास विभागात

आवाज न्यूज नेटवर्क –

 नाशिक – राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल कामगिरी करून राज्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली असून, त्यात नाशिकची सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत हिची आदिवासी विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे, यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे विशेष धोरण आहे. त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अशा गुणवंत खेळाडूंबाबत चर्चा केली. त्यानंतर या समितीने आठ खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक व क्रीडाविषयक पात्रतेनुसार शासकीय सेवेत थेट सामावून घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यास मुख्यमंत्री फडणवीस आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मान्यता दिली आहे.

या खेळाडूंना मिळाली संधी

संदीप यादव (क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा विभाग), कविता राऊत (आदिवासी विकास विभाग), ओंकार ओतारी (तहसीलदार, महसूल विभाग), अजिंक्य दुधारे (क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा विभाग), पूजा घाटकर (विक्रीकर निरीक्षक, विक्रीकर विभाग), नितीन मदने (तहसीलदार, महसूल विभाग), किशोरी शिंदे ( नगरविकास विभाग) आणि नितू इंगोले (क्रीडा विभाग) यांचा समावेश आहे.

२०१३ पासून या निर्णयाची वाट पाहत होते. मला आदिवासी विभागात काम करण्याची इच्छा आहे. आदिवासी विभागात मोठे टॅलेंट आहे. माझ्यासारखी एक कविता मी तयार करू शकले तरी मी भाग्य समजेन.
– कविता राऊत, धावपटू

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *