facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / Featured / चोरट्यांना एसटी वाटते ‘सेफ’

चोरट्यांना एसटी वाटते ‘सेफ’

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – बँकेतून ग्राहकाने पैसे काढल्यानंतर ते पाठलाग करून लुटल्यानंतर पोलिसांच्या नाकेबंदीत अडकू नये म्हणून टोळीतील सदस्य बसस्थानकावरील पार्किंगमध्ये मोटारसायकली लावत होते. तेथुन एसटी बस व ट्रॅव्हल्समधून प्रवास करून शिर्डी येथे जात. पुन्हा दुसऱ्या दिवशी टोळी चोरी करण्यासाठी शहरात येत होती, अशी माहिती नगरमधील पकडलेल्या टोळीतील सदस्यांकडून पोलिस तपासात पुढे आली आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून नगर शहर व ग्रामीण भागात पैसे लुटीचे गुन्हे करणारी टोळीतील पाच जणांना पोलिसांनी शुक्रवारी सापळा रचून जेरबंद केले. पाच ही आरोपी आंध्रप्रदेश राज्यातील असून, ते शिर्डी येथे भाडोत्री खोल्या घेऊन राहत होते. या टोळीत बारा पुरुष व तीन महिला आहेत. टोळीतील सदस्य दोन टोळ्या करून नगर व नाशिक येथे पैशाच्या चोऱ्या करत होते. काही सदस्य बँकेत थांबून पैसे काढत असलेल्या ग्राहकाकडे लक्ष ठेवत होते. हा ग्राहक बँकेतून बाहेर आल्यानंतर त्याचा पाठलाग करत. पैसे पडलेले, मोबाइल पडला असे सांगून हे चोरटे पैशाची बॅग चोरी करून निघून जात होते. तर काही वेळेस चारचाकी गाडीच्या काचा फोडून गाडीतील पैसे लंपास केले जात होते. छोट्या स्क्रू ड्राइव्हरच्या सह्याने मोटारसायकल पंचर केली जात. गाडीचे पंक्चर काढण्यासाठी जात असताना टोळी त्या नागरिकाचे लक्ष विचलित करून लाखो रुपये चोरून नेत होते, अशी चोरी करण्याची पध्दत होती. पैशाची बॅग लुटल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस शहरातून जाणाऱ्या महामार्गावर नाकेबंदी करत. परंतु नाकेबंदी दरम्यान पकडू नये म्हणून चोरटे चोरीसाठी वापरलेल्या महागड्या मोटारसायकली तारकपूर, माळीवाडा या बसस्थानकावरून लावत होते. त्यानंतर शिर्डीकडे जाणाऱ्या मिळेल एसटी बस किंवा रस्त्यावर येऊन लक्झरी ट्रॅव्हल्समधून निघून जात. लक्झरीमध्ये या लोकांवर कोणाचा संशय येत नव्हता. तसेच पोलिसांकडून पकडले जाणे शक्य नव्हते. शिर्डीत पैसे ठेवून आल्यानंतर पुन्हा नगरमध्ये येऊन याच पध्दतीने चोरी करण्याचा धडका गेल्या पाच महिन्यांपासून चोरट्यांचा सुरू होता. परंतु अखेर पोलिसांनी शिताफीने सापळा रचून या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून दोन गिलवर, छर्ररे, तीन मोबाइल, एक खोटा मोबाइल, अंगाला खाज येणाऱ्या पावडरच्या पुड्या, मोटारसायकल पंचर करण्यासाठी स्क्रू ड्राइव्हर असे साहित्य पोलिसांना जप्त केले आहे. चोरीला गेलेल्या लाखो रुपयांची रक्कम हस्तगत करणे, टोळीतील इतर सदस्यांना जेरबंद करणे, असे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *