facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / तांबे, करपे यांची प्रचारात आघाडी

तांबे, करपे यांची प्रचारात आघाडी

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत हळूहळू रंग चढू लागला आहे. दाखल झालेल्या २० पैकी ६ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यामुळे नगराध्यक्षपदासाठी १४ अर्ज शिल्लक असून या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या दुर्गा तांबे व भाजपचे ज्ञानेश्वर करपे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सोशल मीडियावर जोरदार संपर्क सुरू झाला आहे तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्षही हम भी कम नही, असे म्हणत कामाला लागले आहेत.

प्रभागामधील लढतीमध्ये प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सर्वच प्रभागांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना यांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याने सर्व उमेदवारांपुढे राजकीय रणनीती ठरविण्यात मोठी अडचण निर्माण झाल्याचे दिसते. यंदाची निवडणूक सामाजिक स्तरावर गेल्याने त्या दृष्टीनेच आता व्यूहरचना उमेदवारांनी सुरू केली आहे. शिवसेनेचे अप्पासाहेब केसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शौकत भाई जहागीरदार, रासपचे सचिन देशमुख व अपक्ष म्हणून शरद थोरात रिंगणात आहेत; मात्र, हे सर्वजण उभे राहिले तर याचा काँग्रेसला निश्चितपणे फायदा होण्याची शक्यता काही राजकीय विश्लेषक वर्तवित आहेत. पक्षाने वरच्या पातळीवर आदेश देऊनही व युतीची भाषा करूनही एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे ठाकल्याने मतदार व कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे हे चारही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची शक्यता गृहित धरून आणखी मतांची विभागणी टाळण्यासाठी उर्वरित अपक्ष उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे महत्त्व वाढले असून अर्ज छाननीनंतर या अपक्ष उमेदवारांची मनधरणी करून अर्ज मागे घेण्याची विनंती प्रत्येक प्रमुख उमेदवार करू लागला आहे.

अर्ज माघारी घेण्याची तारीख लक्षात घेता ऐनवेळेस धावपळ होऊ नये म्हणून शक्य तेवढे उमेदवार आपल्या लढाईतून दूर करण्यासाठी प्रमुख उमेदवारांनी अपक्ष उमेदवारांच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला आहे. ही सर्व परिस्थिती असली तरी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीपूर्वी भाजप-सेना युती होते का? याचाही प्रयत्न सुरू झाला आहे.

भाजपकडून निवडणुकीतील गंभीरता स्पष्टपणे दिसून येते. कारण स्थानिक पातळीवरील या घडामोडींची माहिती तातडीने त्यांनी मागवून घेऊन युती होण्याबाबत किंवा न होण्याबाबत फायदा-तोटा आजमविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होण्याबाबतचे प्रयत्न सुरू झाले होते; मात्र, यामध्ये अद्याप यश आलेले दिसत नाही. त्यातच राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीतही दोन्ही काँग्रेसमध्ये बिघाडी झाल्याने आघाडीबाबतचा निर्णय आता होणे दुरापास्तच झाल्याचे दिसून येते. १४ प्रभागांची २८ नगरसेवकांची निवड होणार आहे. त्यासाठी २०४ दाखल अर्जांपैकी २५ अर्ज बाद झाले आहेत, त्यामुळे १८४ अर्ज राहिले आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *