facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / पाठिंब्यासाठी मोर्चेबांधणी

पाठिंब्यासाठी मोर्चेबांधणी

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – विधान परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर रविवारपासून भाजप उमेदवार चंदुलाल पटेल आणि अपक्ष उमेदवार अॅड. विजय पाटील यांच्यासह अन्य उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली. अन्य राजकीय पक्ष आपल्याच पाठिशी असल्याचा दावा केला आहे. विधान परिषदेच्या एका जागेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी भाजपचे उमेदवार चंदुलाल पटेल यांच्यासाठी माघार घेतली, तर अन्य सात अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

भाजप उमेदवार चंदुलाल पटेल यांनी निवडणूक प्रचार दौऱ्यास प्रारंभ केला आहे. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चोपडा, धरणगाव येथे भेटी दिल्या. चोपडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी यांची सदीच्छा भेट घेऊन त्यांचे सहकार्य मागितले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांचीदेखील भेट घेतली. दोघांनी भाजपसाठी आपल्या पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेतली असल्याने या निवडणुकीत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. धरणगाव येथे प्रमुख कार्यकर्त्यांची पटेल यांनी भेट घेतली. आपण सर्व पक्षाच्या नेत्यांची सहकार्यासाठी भेट घेत असल्याचे चंदुलाल पटेल यांनी मटाशी बोलतांना सांगितले.

खाविआचे नेते सुरेश जैन यांची चंदुलाल पटेल यांनी भेट घेतली असता, सुरेश जैन यांनी त्यांना पक्षाने योग्य उमेदवार दिला असल्याचे सांगत आपण आपल्यासोबत असल्याचे पटेल यांना या भेटीत सांगितले. रविवारी सकाळी जयनगरातील पटेल यांच्या निवासस्थानी भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. विविध तालुक्यातील आमदार व कार्यकर्त्यांना भाजप उमेदवारासाठी मतदारांशी संपर्क साधण्याचे आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले. यानुसार भाजप आमदार आपापल्या तालुक्यात मतदारांशी संपर्क साधणार असल्याचे सांगण्यात आले. जळगाव महापालिकेतील नगरसेवक आणि मराठा विद्याप्रसाक समाजाच्या निवडणुकीत क्रांती घडवणारे नरेंद्र पाटील यांचे लहान बंधू अॅड. विजय पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून विधान परिषदेची निवडणूक लढवत आहेत. नरेंद्रअण्णांनी जळगाव शहरातील नगरसेवकांची भेट घेतली तर, अॅड. विजय पाटील यांनी भुसावळ, वरणगाव येथे मतदारांची भेट घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार, हेमंतकुमार साळुंखे आहेत. अॅड. विजय पाटील यांनी विधान परिषदेच्या या निवडणुकीत कुठल्याही धनशक्ती व अमिषाला बळी न पडता उमेदवारी कायम ठेवली आहे. अन्य राजकीय पक्षांनीदेखील आपल्याला पाठिंबा दिल्याचा दावा विजय पाटील यांनी मटाशी बोलतांना केला.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *