facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / माजी मंत्री जयवंतीबेन मेहता यांचं निधन

माजी मंत्री जयवंतीबेन मेहता यांचं निधन

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – माजी मंत्री जयवंतीबेन मेहता यांचं निधनभाजपच्या ज्येष्ठ नेत्या व माजी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री जयवंतीबेन मेहता यांचं मुंबईतील निवासस्थानी निधन झालं आहे. मध्यरात्रीनंतर दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

जयवंतीबेन गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यातच रविवारी रात्री त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि दीड वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शिवाजी पार्क स्मशानभूमीत आज सायंकाळी ५.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गृहिणी ते केंद्रीय मंत्री

गृहिणी ते केंद्रीय मंत्री असा जयवंतीबेन यांचा प्रवास राहिला. जयवंतीबेन यांनी १९६२मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. नगरसेवक, आमदार, खासदार अशा राजकारणातील पायऱ्या त्यांनी सहज पार केल्या. १९६८ मध्ये मुंबई पालिकेत नगरसेवक म्हणून त्या निवडून आल्या. त्यानंतर १० वर्षे त्या पालिकेत प्रतिनिधित्व करत होत्या. आणीबाणीच्या काळात १९ महिने त्यांनी बंदीवास भोगला. त्यानंतर १९७८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या व विधानसभेत दाखल झाल्या. १९८० मध्ये भाजपच्या कार्यकारिणीत त्यांना स्थान देण्यात आलं. पुढे १९८९ मध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघातून भाजपने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि पहिल्यांदाच त्या लोकसभेत पोहोचल्या. त्यानंतर दिल्लीच्या राजकारणात स्वत:ची छाप पाडणाऱ्या जयवंतीबेन यांची अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये ऊर्जा राज्यमंत्रिपदी वर्णी लागली. १९९६ ते १९९९ या काळात त्या केंद्रीय मंत्री होत्या. २०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला आणि तिथूनच त्या सक्रिय राजकारणातून बाजूला झाल्या. ‘मार्चिंग विथ टाइम’ नावाचं इंग्रजी आत्मचरित्रही त्यांनी लिहिलं आहे.

जयवंतीबेन यांचं कार्य पथदर्शी: मुख्यमंत्री

जयवंतीबेन यांनी नगरसेवक, आमदार, खासदार म्हणून पथदर्शी असं कार्य केलं होतं. भाजप कार्यकर्त्यांसाठी त्या मातृतुल्य होत्या. त्यांच्या निधनाने आम्ही एक जेष्ठ नेतृत्व गमावलं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयवंतीबेन यांना श्रद्धांजली वाहिली.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *