facebook
Friday , February 24 2017
Breaking News
Home / Featured / शिक्षणव्यवस्थेवर कलावंतांचे आसूड

शिक्षणव्यवस्थेवर कलावंतांचे आसूड

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – नेट-सेट, पीएचडी अशा पदव्या असताना, नोकरीसाठी वशिला अन् संस्था चालकांकडून आकारला जाणारा पैसा, या चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या स्किटने (प्रहसन) उपस्थितांची दाद मिळविली. खळखळ हसविणाऱ्या प्रसहनातून शिक्षण व्यवस्थेवर विद्यार्थी कलावंतांनी नेमके बोट ठेवले, अन् वाहवाह मिळविली.
विविध कला प्रकारांत बहारदार सादरीकरणाने तरुणाईने महोत्सवात रंगत आणली आहे. दुसऱ्या दिवशी प्रसहन कला प्रकारात नाशिकच्या मुक्त विद्यापीठाच्या संघाने स्वर्ग लोकातील विविध पात्रांच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेतील दोषांवर प्रकाश टाकला. बेरोजगार विविध सोंग घेत, इतरांची फसवणूक करून कशी पोट भरतात अन् ही वेळ का आली हे सांगण्याचा त्यांनी प्रहसनातून प्रयत्न केला. नेट-सेट, पीएचडीसारख्या पदव्या असूनही करावी लागणारी पायपीट अन् संस्थाचालकांकडून नोकरीसाठी मागितला जाणारा पैसा, वशिला, भ्रष्ट राजकीय व्यवस्था, बेरोजगारी याबाबींवर दहा मिनिटांच्या स्किटमधून विद्यार्थ्यांनी नेमकेपणाने बोट ठेवले. स्किटमध्ये विजय ठोंबरे, विवेक खराटे, साईनाथ भिंगारे, बद्रीनारायण कुबेर, नारायण त्यारे, शंभुराजे जाधव, धनंजय मांगदरे यांनी भूमिका साकारल्या आहेत. नोकरीसाठी लागणारा पैसा, वशिला, त्यातून होणारी लूट याबाबत या संघाने साकारलेल्या या स्किटला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत, उपस्थितांनी सभागृह डोक्यावर घेतले.

बेरोजगारीची व्यथा रंगमंचावर
वयाची ३०, ३५ वर्षे ओलांडली, विविध पदव्या मिळविल्या तरी नोकरीच्या शोधात भटकावे लागते आहे, खेटे मारावे लागतात. असेच काही बेरोजगार स्वर्गलोकातील पात्रांच्या माध्यमातून इतरांची फसवणूक करून पोट भरतात हे दाखविण्यात आले आहे. प्रसहनातील नारदमुनी, इंद्र अन् रंभा ही पात्र देवगिरी व्यासपीठावर अवतरली अन् स्पर्धेत रंगत आली.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *