facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / हर्डीकर अन् मासिरकरांची मोहीम फत्ते

हर्डीकर अन् मासिरकरांची मोहीम फत्ते

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – सध्या शहरात सायकलिंगचा नवा ट्रेन्ड चांगलाच बघायला मिळत आहे. भल्या सकाळी अनेक सायकलस्वार शहरातील रस्त्यावर दिसून येतात. यातील अनेकजण फिटनेसकरिता, तर काही लांब पल्ल्याच्या शर्यती विशिष्ट वेळेत कशा पूर्ण करता येतील याचा सराव करताना दिसून येतात. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारही असाच काही होता. ‘नागपूर रॉनदेव्होरस’तर्फे १०० किलोमीटरची ‘पॉप्युलेअर’ हा सायकलिंगचा उपक्रम घेण्यात आला. विशेष म्हणजे यात महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलिस उपायुक्त दीपाली मासिरकर केवळ सहभागीच झाले नाही, तर त्यांनी हे अंतरही पूर्ण केले.

काहीशा कठीणच अशा या स्पर्धेत सहभागी झालेल्या ९१ पैकी ८५ स्पर्धकांनी १०० किलोमीटरचे अंतर सात तासात पूर्ण केले. या उपक्रमात ९५ स्पर्धकांनी नोंदणी केली होती. स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांमध्ये १५ महिला सायकलपटूंचा समावेश होता यावरून महिलांमध्येही सायकलिंग हा प्रकार किती लोकप्रिय होत आहे हे स्पष्ट होते. १०० किलोमीटरच्या या स्पर्धेला सकाळी वाजता झिरो माईल येथून सुरूवात झाली. कोराडी, सावेनेर बायपास व तिथून परत अशा अंतराचा यात समावेश होता. प्रत्येक २५ किलोमीटरनंतर एक चेक पॉईंट होता. तर ६० किलोमीटरवर फूड पॉईंट ठेवण्यात आला होता. स्पर्धेत सहभागी झालेल्यांमध्ये आर्यमान बन्सोड हा १४ वर्षीय मुलगा सर्वात कमी वयाचा, तर डॉ. एस.डी भावे हे ७० वर्षीय सर्वाधिक वयाचे स्पर्धक होते. अंतर पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना पदक व प्रमाणपत्र देण्यात आले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *