facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / एसटीचे नियमित भाडे १५ नोव्हेंबरपासून
st-bus

एसटीचे नियमित भाडे १५ नोव्हेंबरपासून

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – एस. टी. महामंडळाने दिवाळीसाठी केलेल्या हंगामी भाडेवाढीचा बोजा अजून तीन दिवस प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. १५ नोव्हेंबरपासून नियमित दराने भाडे आकारणी केली जाणार आहे.

एसटीने दिवाळीनिमित्त ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून हंगामी भाडेवाढ केली. त्यानुसार प्रति टप्पा (६ कि.मी.) ६ रुपये ३० पैसे असणारी नियमित तिकीट आकारणी भाडेवाढीनंतर ६ रुपये ९५ पैसे झाली आहे. रातराणीचे भाडे हंगामी भाडेवाढीमुळे ८ रुपये २० पैसे झाले. द‌विाळीनंतर ठरावीक दिवसच हंगामी भाडेवाढ आकारण्याचा आलेख एस. टी. ने तयार केला आहे. त्यासाठी सन २०१५ मधील प्रवासी वाहतुकीचा आधार घेण्यात आला आहे. हंगामी भाडेवाढीच्या वेळापत्रकानुसार नोव्हेंबर महिन्यात शनिवार १२, रविवार १३ आणि सोमवार १४ या दिवशी वाढीव दराने भाडे आकारले जाणार आहे. या व्यतिरिक्त इतर दिवशी नियमित दराने भाडे आकारणी होणार आहे.

येत्या १२ ते १४ नोव्हेंबर दरम्यान वाढीव दराने तिकिटाची आकारणी प्रवाशांकडून करण्यात येणार आहे. त्यानंतर नियमित दराने भाडेआकारणी होणार आहे.
– आर. बी. खडसे, आगार प्रमुख, जळगाव

Check Also

news-1

नियमितीकरणासाठी फक्त एक रुपया

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – नगर शहरात खासगी व सरकारी खुल्या जागांवर असलेल्या सर्वधर्मिय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *