facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / निसर्गचित्रांनी वेधले लक्ष
????????????????????????????????????
????????????????????????????????????

निसर्गचित्रांनी वेधले लक्ष

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – हिरवागार निसर्ग, डोंगर, मंदिर अन् निसर्गाच्या कुशीत वसलेले ऐतिहासिक सोनेरी महल, असा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नयनरम्य परिसर आपल्या कुंचल्यातून विद्यार्थी स्पर्धकांनी हुबेहूब साकारला. अफाट कल्पनाशक्तीने अतिशय सुंदर निसर्गचित्रे रेखाटत तरुणाईने ‘इंद्रधनुष्य’ महोत्सवात सर्वांचे लक्ष वेधले.
आंतर-विद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवात दुसऱ्या दिवशी ‘ऑन द स्पॉट पेंटिंग’ (स्थळ चित्र) स्पर्धेत १४ संघांनी सहभाग घेतला. ‘प्रतिष्ठाण’ (ललितकला विभाग) व्यासपीठावर या कलाकृतींचे सादरीकरण झाले. या स्पर्धेत विद्यापीठ परिसरातील १ किलोमीटरच्या परिसरातील स्थळांचे चित्र विद्यार्थ्यांना रेखाटायचे होते. त्यासाठी अडीच तासांचा कालावधी देण्यात आला होता. ‘ऑन द स्पॉट पेंटिंग’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी चित्रांमध्ये हिरवागार निसर्ग टिपण्याचा प्रयत्न केला. परिसरातील गोगा बाबा टेकडी, डोंगर दऱ्यांची रांग, मंदिर, इतिहास विभागाचे गेट, दोन्ही बाजूंनी झाडांनी वेढलेल्या रस्त्याचे दृश्य साकारत विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे दर्शन घडविले. उत्तम रंगसंगती, यथा दर्शन, स्पेस, छायाभेदच्या माध्यमातून हे निसर्गचित्र साकारले आहेत. हॅनमेड कागदावर विद्यार्थ्यांनी साकारलेली ही निसर्गचित्रे विविध रंगछटांचे दर्शन घडविणारे ठरले.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *