facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / निसाकात पुन्हा चोरीचा प्रयत्न
nisaka

निसाकात पुन्हा चोरीचा प्रयत्न

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – अडीच महिन्यांपूर्वी निफाड सहकारी साखर कारखान्याच्या पॉवर हाऊसमध्ये १ लाख २२ हजार रुपयांच्या साहित्याची चोरी झाली होती. तिचा तपास अद्याप लागलेला नसताना पुन्हा त्याच ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याची फिर्याद जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी आर. बी. कदम यांनी निफाड पोलिसांना दिली आहे.

निफाड साखर कारखान्याच्या इंजिनीअर विभागातील पॉवर हाऊसमध्ये २७ ऑगस्टच्या दरम्यान चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. या चोरीची फिर्याद घेण्यास पोलिसांनी साहित्य खरेदीच्या पावत्या दाखवण्याची अट घालत टाळाटाळ केली होती. यावर ‘मटा’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर निसाकाच्या व्यवस्थापनाने किरकोळ चोरीची तक्रार दाखल केली होती. या चोरीचा अद्याप तपास लागलेला नाही. पोलिसांच्या तपासशून्य पद्धतीमुळे चोरांची हिंमत वाढल्याचा हा प्रकार असल्याचे मत निसाकाच्या सभासदांनी व्यक्त केले आहे.

निसाकाची २९ ऑगस्ट रोजी जप्ती केल्यामुळे त्याचा ताबा जिल्हा बँकेकडे आहे. निफाड पोलिॉस स्टेशनला आर. बी. कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे, की इंजिनीअर विभागातील पॉवर हाऊसमध्ये चोरट्यांनी कॉपर प्लेट चोरीचा प्रयत्न केला असून, त्याची चौकशी करावी. १३६ कोटींचे कर्ज असलेला निसाका सध्या मरणकळा सोसत आहे. बँकेने कारखाना जप्त केला. सभासद, जाणकार लोक, निसाका संघर्ष समिती कारखाना सुरू करण्यासाठी एका बाजूला प्रयत्न करीत असताना कारखान्याच्या मालमत्तेवर डल्ला मारण्याचा उद्योग कोण करत आहे, त्यांना कुणाचा पाठिंबा आहे, असा प्रश्न निसाकाचे सभासद विचारत आहेत.

दरम्यान, या चोरीप्रकरणी पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ऑगस्टमधील चोरीचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

मागची चोरी पचवण्यासाठी चोरी?

नुकतीच झालेली चोरी ही मागे झालेली चोरी पचवण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण चोरलेले साहित्य पुन्हा तिथेच टाकून दिलेले आहे. त्यामुळे हे माहीतगार व्यक्तीचे कृत्य असल्याचे बोलले जात आहे. निफाड पोलिसांनी चोरीचा तपास न लावल्याने निसाकाचे प्राधिकृत अधिकारी सुधीर कराड आणि काही लोक जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार घेऊन गेले होते.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *