facebook
Wednesday , December 7 2016
Home / Featured / पिंपरी बुटीला ‘अक्षय’ऊर्जा
ak

पिंपरी बुटीला ‘अक्षय’ऊर्जा

आवाज न्यूज नेटवर्क –

यवतमाळ – शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून गहिवरलेल्या अभिनेता अक्षयकुमारने सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी प्रशासनाकडून पिंपरी बुटीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच हा प्रस्ताव अक्षयकुमारकडे सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, शेतकऱ्याच्या घरी जेवण, यामुळे पिंपरी बुटी चर्चेत आले होते.

सततच्या दुष्काळामुळे गेल्या दहा वर्षांत गावात ११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मार्च २०१५मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गावात आल्यानंतर योजनांच्या माध्यमातून विकासाचा प्रयत्न करण्यात आला. पण, अजूनही अनेक प्रश्न कायमच आहेत.

Check Also

wari

नागपुरात रंगणार ‘शिक्षणाची वारी’

विदर्भातील शिक्षकांच्या कल्पकतेतून साकारलेल्या शैक्षणिक प्रयोगांचे प्रदर्शन नागपुरात गुरुवारपासून सुरू होणार आहे. शिक्षणाची वारी म्हणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *