facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / फटाका असोसिएशनवर गुन्हा
dsc_6994

फटाका असोसिएशनवर गुन्हा

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – औरंगपुरा फटाका मार्केट आगप्रकरणी तब्बल आठ दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तक्रार दिल्यानंतर शनिवारी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. फटका मार्केट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
दिवाळीनिमीत्त दरवर्षी औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदानावर फटाक्यांची दुकाने थाटण्यात येतात. यंदा असोसिएशसच्या माध्यमातून १४० दुकाने थाटण्यात आली होती. २९ ऑक्टोबर रोजी, नरक चतुदर्शीच्या दिवशी या मार्केटमधील दुकान क्रमांक ४६ला आग लागल्याचा संशय आहे. या आगीत १४० दुकाने तसेच शंभरावर वाहने जळून खाक झाली. या घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. तपासादरम्यान फटाका असोसिएशनने दुकानदारांना योग्य त्या सुविधा पुरवल्या नसल्याचे दिसून आले. नियमानुसार असलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन करीत स्फोटक पदार्थाच्या बाबतीत निष्काळजीपणा करून नागरिकांच्या जीवितास; तसेच मालमत्तेचे नुकसानीस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी महापालिका अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी मोहम्मद जाफरखान मोहम्मद इब्राहीम खान यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून औरंगाबाद शहर फायर वर्क्स डिलर्स असोसिएशनचे कोषाध्यक्ष विलास पूनमचंद खंडेलवाल व इतर पदाधिकारी; तसेच संभाजीनगर फटका असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसरंक्षण अधिनियम कायदा, भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय विजय पवार तपास करीत आहेत.

तपास कासवगतीने; प्रशासनाकडून स्मरणपत्र
औरंगाबाद ः फटाका मार्केटमध्ये झालेल्या अग्नितांडवाची तत्काळ चौकशी करावी, असे आदेश असतानाही घटनेला आठवडा उलटून गेल्यानंतरही तपास कासवगतीने सुरू आहे. दरम्यान, महापालिका, पोलिस, महावितरण या यंत्रणांना अहवालासाठी समितीने स्मरणपत्र पाठविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणाचा अहवाल महसूल यंत्रणा सरकारकडे पाठविणार आहे. त्यासाठी तपास करणाऱ्या यंत्रणांनी कोणताही अहवाल समितीकडे दिला नाही. यामुळे महसूल विभागाने महावितरण, पोलिस प्रशासन; तसेच महापालिका यंत्रणांना अहवाल पाठवण्यासंदर्भात स्मरणपत्र पाठवले आहे.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *