facebook
Thursday , March 2 2017
Breaking News
Home / Featured / कोषागार विभाग पाठविणार पत्र

कोषागार विभाग पाठविणार पत्र

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – केंद्र सरकारच्या jeevanpramaan.gov.in या संकेतस्थळावरील अनेक केंद्रांच्या माध्यमातून निवृत्त वेतनधारकांना ई जीवनप्रमाणपत्र पुरविण्याचे दावे करण्यात आले. मात्र, या संकेतस्थळावरील केंद्रच बोगस असल्याचे वृत्त म.टा.ने प्रसिद्ध केल्यानंतर नागपूर जिल्हा कोषागार कार्यालयानेही याची दखल घेत लेखा व कोषागार संचालनालयाला पत्र पाठविण्याची तयारी दर्शविली.

निवृत्तवेतनधारकांना आपण जिवंत असल्याचे प्रमाणपत्र भरणे सोयीचे व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये ई -जीवन प्रमाणपत्र योजनेची घोषणा केली. २०१५ पासून या योजनेची अंमलबजावणीही सुरू झाली. jeevanpramaan.gov.in या संकेतस्थळावर अनेक केंद्रांच्या माध्यमातून ही सुविधाही उपलब्ध करून देण्याचे दावे करण्यात आले. मात्र, यावरील अनेक केंद्र सक्रिय नसल्याचे वास्तव आहे.

म.टा.ने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हा कोषागार विभागाने या केंद्रांची स्वतंत्र यादीच तयार केली आहे. निवृत्त वेतनधारकांना सुविधा देणे हे शासनाचे कर्तव्य असून त्या दिशेने लगेच पावले उचलून या बोगस केंद्रांची नावे वगळण्यासाठी मुंबईतील लेखा व कोषागार संचालनालयाला कळविण्यात येणार असल्याचे जिल्हा कोषागार कार्यालयातील वरिष्ठ कोषागार अधिकारी मोना ठाकूर यांनी सांगितले.

अशी आहेत बोगस केंद्र

जीवन प्रमाणच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर घराजवळील केंद्र शोधण्यासाठी locate centre अशी लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर गेल्यानंतर लोकेशन आणि पिनकोड या दोन लिंकच्या साहाय्याने आपल्या घराजवळील केंद्र शोधता येते. म.टा.ने वेगवेगळ्या भागातील पिन कोड टाकून केंद्रांची माहिती गोळा केली. ही केंद्र कशी काम करत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता धक्कादायक वास्तव पुढे आले. सदर येथील अंजुमन केंद्राचा क्रमांकच चुकीचा आहे. कडबी चौकातील गौरव गुप्ता म्हणून दिलेला मोबाइल नंबर कुण्या यादव नावाच्या व्यक्तीला लागतो. महाल येथील चिराग इंटरप्राईजेसचा मोबाइल नंबरही बंद आहे. वर्धा मार्गावरील स्वामी सीतारामदासजी नावाने असलेल्या केंद्राशीही कुठलाच संपर्क होत नाही. उमरेड मार्गावरील भवानी प्रा.इंडस्ट्रियल केंद्राशी संपर्क साधला असता आम्ही कधी या योजनेत सहभागीच झालो नसल्याचे सांगितले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *