facebook
Thursday , March 2 2017
Breaking News
Home / Featured / ग्रामपंचायतच करते वीजचोरी

ग्रामपंचायतच करते वीजचोरी

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – मळगाव खुर्द येथील प्रकार; व‌ीजवितरण, ग्रामसेवकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दीपक महाजन, कळवण

एकीकडे वीजवितरण कंपनी वीज चोरीबाबत गंभीरता बाळगते. चोरी रोखण्यासाठी तत्काळ वीज जोडणी करण्यास महावितरण पावले उचलते. असे असताना दस्तूरखुद्द जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील मळगाव खुर्द ग्रामपंचायत कार्यालयातच वीजचोरी होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एका शासकीय कार्यालयाचे नुकसान ग्रामीण शासनव्यवस्थेचा मुख्य घटक असलेल्या ग्रामपंचायतीमार्फत होत आहे. यामुळे वीजवितरण आणि ग्रामसेवकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

वीज वितरण कंपनी मार्फत सिंगलफेज कनेक्शन २४ तासांच्या आत (सर्व पूर्तता झाल्यावर) देण्यात येते. ज्या ठिकाणी वीजपुरवठ्याबाबत विद्युत पोल अथवा अन्य सुविधा आवश्यक असतील त्याही महिनाभराच्या आत देण्यासाठी महावितरण कार्यतत्पर असल्याचे सांगण्यात येते. वीजग्राहकाच्या सेवेला महत्त्व न देणाऱ्या संबंधित घटकावर महावितरण दंडात्मक कार्यवाही करू शकते, असा लिखित नियम महावितरणचा आहे. तेव्हा मळगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांमार्फत जोडणीचा अर्ज देऊनही तीन महिन्यांचा कालावधी कसा लागला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याची उत्तरे द्या

वीजवितरण कार्यालय दोषपात्र आहे की ग्रामसेवकाने पाठपुरावा केला नाही?

नियमावली जनतेला बंधनकारक करताना ग्रामपंचायतीकडून हे घडते कसे?

ग्रामपंचायतीला वीजपुरवठ्याबाबत तीन महिन्यांचा उशीर झालाच कसा?

वीजचोरी करणाऱ्या ग्रामपंचायतीवर कारवाई होणार?

काय आहे प्रकरण?

तालुक्यातील मळगाव खुर्द येथे दिवसाढवळ्या वीजचोरी होत आहे. चक्क ग्रामपंचायत कार्यालयामार्फत दिवसाढवळ्या राजरोसपणे ही वीजचोरी होत आहे. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप आता ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत काही सुजाण नागरिकांकडून हा प्रश्न काही ग्रामसभेत विचारण्यात आला. मात्र त्यावेळेस समाधानकारक तर सोडा मात्र उडवाउडवीची उत्तरे ग्रामसेवक बहिरम यांनी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कंपनीकडे वीज जोडणीसाठी ग्रामपंचायतमार्फत अर्ज केला आहे पण तीन महिने उलटूनसुद्धा जोडणी झालेली नाही. जुने ग्रामपंचायत कार्यालय हे गळत असल्यामुळे जून महिन्यात स्थलांतरीत झाले आहे. तेव्हापासून आजतागायत ही वीजचोरी सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही, यावरून प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

तीन महिने उलटून गेल्यावर जर महावितरण कंपनी वीजजोडणी करू शकत नसेल तर हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर न्यावे. आम्ही ग्रामसभेत प्रश्न केला. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

– राम गवळी, ग्रामस्थ

सिंगल फेज योजना ग्राहकाला तत्काळ वीजजोडणी उपलब्ध करून देते. विभागाकडे प्रलंबित प्रकरणे सहसा राहातच नाहीत. दंडात्मक कारवाईमुळे आमच्या विभागाकडून कोणतीही चूक होणार नाही.

– ऋषिकेश खैरनार, उप कार्यकारी अभियंता, महावितरण, कळवण

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *