facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / जीवनप्रमाणपत्र भरण्याच्या सहा पद्धती

जीवनप्रमाणपत्र भरण्याच्या सहा पद्धती

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या निवृत्त वेतन धारकांना आपले वेतन नियमित सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये जीवनप्रमाणपत्र भरावे लागते. मुदतीच्या आत प्रमाणपत्र भरले नाही तर त्यांचे वेतन रोखण्यात येते. जीवनप्रमाणपत्र भरण्याच्या सहा पद्धती सध्या उपलब्ध असल्याचे सांगत ३० नोव्हेंबरच्या आत प्रमाणपत्र भरण्याचे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयातील वरिष्ठ कोषागार अधिकारी मोना ठाकूर यांनी केले. नागपूर जिल्ह्यात राज्य शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेले तब्बल ५२ हजार कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना दरवर्षी आपण हयात असल्याचे प्रमाणपत्र जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सादर करावे लागते.

१ नोव्हेंबरपासून प्रमाणपत्र भरण्याला सुरुवात झाली. विविध कारणांमुळे अनेकजण हे प्रमाणपत्र वेळेत सादर करू शकत नाही. त्यामुळे हजारो वेतन धारकांचे वेतन रोखून ठेवण्यात येते. थकलेल्या वयात धावपळ करत त्यांना हा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांच्या माध्यमातून जीवनप्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन ठाकूर यांनी केले आहे.

असे भरू शकता जीवनप्रमाणपत्र

बॅंकांमध्ये वेतनधारकांची यादी कोषागार कार्यालयाकडून पाठविण्यात आली आहे. त्यासमोर स्वाक्षरी करूनही हयात असल्याचा पुरावा देता येतो.

कोषागार कार्यालयाकडून विहीत नमुन्यातील अर्ज भरूनही प्रमाणपत्र सादर करता येते.

थेट कोषागार कार्यालयात येऊनही जीवनप्रमाणपत्र सादर करता येते.

बाहेरगावी राहणारे तेथील बॅंकेतील अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेऊन प्रमाणपत्र पाठवू शकतो.

to.nagpur@zillamahakosh.in या संकेतस्थळावर मेलही करू शकता.

परदेशात असाल तर तेथील दुतावास कार्यालयाकडून स्वाक्षरी घेऊन प्रमाणपत्र पाठवू शकता.

रुग्ण डॉक्टरांचे प्रमाणपत्र जोडून जीवनप्रमाणपत्र पाठवू शकतात.

डिजिटल लाइफ सर्टिफिकेट

सेवानिवृत्तांना जीवनप्रमाणपत्र भरण्यासाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. बोटांचे ठसे घेण्याची सुविधा जिल्हा कोषागारामध्ये तसेच सर्व तालुका उपकोषागार कार्यालयात उपलब्ध आहे. लवकरच जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि राष्ट्रीयीकृत बॅंका येथेही ही सुविधा उपलब्ध करण्यात येईल. निवृत्त वेतन धारकाने पीपीओ क्रमांक, नाव, मोबाइल क्रमांक, किंवा ई मेल आयडी आदी माहिती घेऊन जावे. जीवन प्रमाण पोर्टलवर ही सुविधा उपलब्ध आहे. बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोबाईलवर एसएमएस प्राप्त होणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. जिल्हयातील ३३० निवृत्तवेतन धारकांनी याचा लाभ घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *