facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / डावा कालवा परिसरात पाणीटंचाई

डावा कालवा परिसरात पाणीटंचाई

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – यंदा समाधानकारक पाऊस पडला असता तरी बऱ्याच भागातील भूगर्भातील पाणीपातळी आताच खालावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई भासू लागली आहे. विशेषतः गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्याच्या सिंचन क्षेत्रात ही टंचाई विहिरी आणि बोअरवेलचे पाणी कमी झाल्याने जाणवू लागली आहे. धरणातून या कालव्याचे आवर्तन सुटल्यानंतरच रब्बी हंगामाच्या पेरण्या कराव्या लागणार असल्याने या परिसरातील रब्बीचा हंगाम लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे सरासरी प्रमाण गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत चांगले राहिले आहे. तरीही पावसाळ्यात अधूनमधून पावसाने जास्त काळ उघडीप दिली होती. त्यावेळी हलक्या मुरबाड जमिनीतील खरिप हंगामाच्या पिकांसाठी सिंचनाद्वारे पाणी द्यावे लागत होते.

परतीच्या पावसानंतर खरिपाच्या काढणीच्या अगोदर भुईमूग, मका यासारख्या पिकांना आणि भाजीपाल्यास पाणी द्यावे लागले. याच काळात विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी खाली गेल्याचे दिसू लागले. त्यामुळे रब्बी हंगामासाठी आवश्यक पाण्याचा साठा नसल्याने कालव्याच्या पाण्यावरच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागणार आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *