facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / Featured / पंढरपूर दर्शन रांग वॉटरप्रूफ पत्राशेडची उभारणी पूर्ण

पंढरपूर दर्शन रांग वॉटरप्रूफ पत्राशेडची उभारणी पूर्ण

आवाज न्यूज नेटवर्क
पंढरपूर – (प्रतिनिधी – नागनाथ सुतार) – कार्तिकी यात्रा सोहळ्याचे वेध लागल्याने यात्रेची तयारी पूर्ण करण्यासाठी मंदिर समिती प्रशासन सज्ज झाले आहे .मंदीर समितीच्या वतीने भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे म्हणून दर्शनरांगेत तात्पुरते पाच वॉटरप्रूफ पत्राशेड उभारण्याचे काम पूर्णझाले आहे .
       या 5 वॉटरप्रूफ पत्राशेड करिता ताडपत्री , पत्रे यांचा वापर करण्यात आला आहे .पत्राशेड व दर्शनरांगे साठी 4 हजार पत्रे व 10 हजार वासे वापरण्यात आलेत . रांगेतून दर्शन  घेण्यावर दक्षिणेकडील भाविकांचा अधिक भर असल्याने आजवरचा अनुभव पाहता दर्शन रांग गोपालपूरच्या पुढे जात असल्याने दर्शन गोपाळपूर पर्यंत उभारण्यात येत असल्याचे दिसून  येते .भाविकांना दर्शन रांगेत प्रवेश करता यावा  या साठी 200 फूट अंतरावर प्रवेश गेट  तयार करण्यात आले आहे .

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *