facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / बजाज युनियनच्या अध्यक्षपदी ठेंगडे

बजाज युनियनच्या अध्यक्षपदी ठेंगडे

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद –  बजाज ऑटो एम्प्लॉइज युनियनच्या अध्यक्षपदी बाजीराव ठेंगडे यांची, तर सचिवपदी संपत गायकवाड यांची निवड झाली. कार्यकारणी निवडीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. सोमवारी सकाळपर्यंत मतमोजणीचे काम सुरू होते, अशी माहिती माजी अध्यक्ष भाऊसाहेब वाघमारे व सचिव प्रमोद फडणीस यांनी दिली.
मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटीदार भवन येथे रविवारी सकाळी साडेसातपासून मतदानास सुरुवात झाली. सायंकाळी साडेपाच वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर साडेसात वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. सोमवारी सकाळी साडेनऊपर्यंत मतमोजणी सुरू होती. विजयी सदस्यामधून युनियनची व्यवस्थापकीय कार्यकारणीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी अध्यक्षपदी बाजीराव ठेंगडे यांची तर सचिवपदी संपतराव गायकवाड यांची निवड
करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी तात्यासाहेब पवार, प्रभाकर भोसले, कार्याध्यक्षपदी विजय पवार, कोषाध्यक्षपदी सुधाकर जाधव, सहकोषाध्यक्षपदी मनोहर लघाने, तर सहसचिव म्हणून ज्ञानेश्वर भोरगीर व कांतीलाल पाटील यांची निवड झाली.

विजयी सदस्य
लक्ष्मण आवारे, सत्यविजय देशमुख, केशव पंडित, जयवंत शिंदे, प्रभाकर नायकवाडी, अशोक कटारे, दौलत घोरपडे, प्रकाश मांढरे, उद्धव कावळे, जगन्नाथ कोळी, गोपाल खंडेलवाल, काशीनाथ चौधरी, मोरसिंग नाईक, इंद्रकुमार जाधव, संजय चतुर, सुधीर शेळके, गोरख वेळंजकर, विठ्ठल वानखेडे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *