facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / भर थंडीत मनोरुग्णांना थंड पाण्याने आंघोळ

भर थंडीत मनोरुग्णांना थंड पाण्याने आंघोळ

आवाज न्यूज नेटवर्क –

 नागपूर – प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांना दिलासा देण्याऐवजी त्यांना छळण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. त्यात आता आणखी एका छळाची भर पडली आहे. येथील रुग्णांच्या सोयीसाठी लावलेले सोलर वॉटर हिटर सिस्टीम नादुरुस्त झाल्याने मनोरुग्णांना भर थंडीत गार पाण्याने आंघोळ घातली जात आहे. धक्कादायक म्हणजे हे हिटर दुरुस्त करण्याची जबाबदारी असलेल्या पुण्यातील कंपनीकडून कसलाही प्रतिसाद मिळेना झाला आहे.

मानसिक आजारी असलेल्या रुग्णांसाठी इंग्रजांनी महाराष्ट्रात चार मनोरुग्णालयांची स्थापना केली. मात्र, सरकारी अनास्थेमुळे रुग्णालयांची अवस्था बिकट होत चालली आहे. मनोरुग्णांना सोयी-सुविधा पुरवण्यासाठी शासनाकडून लाखोंचा निधी मंजूर केला जातो. मात्र वेड्यांकडे काय लक्ष द्यायचे, अशा भावनेतूनच प्रशासनाची वागणूक सुरू आहे. मनोरुग्णांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावे यासाठी २००३ मध्ये प्रथम हे वॉटर हिटर सुरू करण्यात आले होते. तेव्हाही ते फेल गेले. त्यानंतर डॉ. अभय गजभिये वैद्यकीय अधीक्षक असताना आठ सोलर लावण्यात आले होते. त्यावेळी रुग्णांना गरम पाणी मिळते किंवा नाही यासंदर्भात निरीक्षण होत असे. अलिकडे कधी दोन, तर कधी सारेच सोलर बंद असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते.

मधल्या काळात सिस्टीमवर वृक्ष पडल्यामुळे गरम पाणी मिळेनासे झाले. त्यामुळे लाकडे जाळून पाणी गरम केले जाते, असे सांगण्यात येत आहे. परंतु, रुग्णांची संख्या पाहता सर्वांनाच गरम पाणी मिळणे कठीण आहे. यामुळे थंडीच्या दिवसातही थंड पाण्याने आंघोळ करावी लागत आहे. काही मनोरुग्ण तर विना आंघोळीनेच राहात असल्याची माहिती सुत्रांनी दिली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित नगरकर यांनी काही सोलर सुरू असून, बिघडलेले सोलर दुरुस्तीसाठी दिल्याचे सांगितले.

शिफारशीकडे दुर्लक्ष

मनोरुग्णालयांच्या सुधारणेसाठी केंद्रीय स्तरावर समिती गठित केली होती. समितीने रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, मनोरुग्णालयात औषधांची कमतरता नसावी. मनोरुग्णांना जास्तीत जास्त व चांगल्यात चांगल्या सोयी देण्याचा प्रयत्न केला जातो. मनोरुग्णांच्या पुनर्वसनाचे काम सुरू ठेवावे, असे समितीने अहवालात म्हटले आहे. परंतु, याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष असल्याचे सांगितले जाते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *