facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / भाडेवाढ, जादा फेऱ्यांमुळे वाढले एसटीचे उत्पन्न

भाडेवाढ, जादा फेऱ्यांमुळे वाढले एसटीचे उत्पन्न

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – दिवाळीतील हंगामी भाडेवाढ आणि जादा फेऱ्यांमुळे एसटीच्या जळगाव विभागाचे नियमित उत्पन्न १३ लाख रुपयांनी वाढले असल्याची माहिती जळगाव विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांनी सोमवारी, पत्रपरिषदेत दिली.

खान्देशातील अनेक जण हे व्यवसाय व शिक्षणानिमित गुजरात, सुरत, वापी, पुणे या शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत. दिवाळीसाठी गावाकडे येणाऱ्यांची संख्या मोठी असते. एसटीने ही बाब लक्षात घेऊन जादा फेऱ्या केल्या. या फेऱ्यांना १ ते ४ नोव्हेंबर या चार दिवसांत १ कोटी ११ लाख ९ हजार ४४२ एवढे उत्पन्न मिळाले. तसेच १ लाख ४३ हजार २२ एकत्रित प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. २६ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान, पुणे ते जळगाव आणि जळगाव ते पुणे या मार्गावर एकूण १२६ फेऱ्या करण्यात आल्या होत्या. त्याद्वारे १३ लाख १५ हजार ९३९ इतके उत्पन्न महामंडळाला प्राप्त झाले असून,१६ हजार ९४१ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. जळगाव, नाशिक, शिर्डी, पिंपळनेर, यवतमाळ आदी मार्गांवरही जादा बस देण्यात आल्याची माहिती खिरवाडकर यांनी दिली. ऑक्टोबरअखेर या जादा फेऱ्यांमुळे १० लाख २० हजार २८२ रुपयांचे उत्पन्न एसटीला मिळाले. जळगाव विभागाला दररोज ५८ लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र, दिवाळी कालावधीत सरासरी १३ लाख रुपयांनी उत्पन्न वाढल्याचे खिरवाडकर यांनी सांगितले. नियंत्रक अभियंता पी. एस. वासकर, विभागीय वाहतूक अधिकारी व्ही. पी. धायडे, कामगार अधिकारी राहूल शिरसाळे, बी. वाय. धनवडे, पी. आर. बागूल, सुरेश महाजन, आर. डी. साबळे, विलास पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *