facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / राजेंद्र तुपारे पंचत्वात विलीन

राजेंद्र तुपारे पंचत्वात विलीन

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर –जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात शहीद झालेले जवान राजेंद्र नारायण तुपारे यांच्यावर आज त्यांच्या कोल्हापुरातील मूळ गावी अत्यंत शोकाकुल वातावरणात, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तुपारे यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो गावकरी तुपारे मजरे कार्वे गावात दाखल झाले होते.

बेळगाव मिलिटरी हॉस्पिटलमधून राजेंद्र तुपारे यांचे पार्थिव आज सकाळी चंदगड तालुक्यातील मजरे कार्वे गावी आणण्यात आले. तिथे काहीवेळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेला मोठा शोकसागर उसळला होता. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुपारे यांच्या मोठा मुलाने पार्थिवाला अग्नी दिला.

जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी राजेंद्र तुपारे यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.

Kolhapur (Maha): Wreath laying ceremony of Naik Tupare Rajendra Narayan, who lost his life in cross border firing by Pak in Poonch (J&K) pic.twitter.com/28UMbsRdxq
— ANI (@ANI_news) November 8, 2016

दरम्यान, पूंछ जिल्ह्यातील साब्जिया सेक्टरमध्ये रविवार ६ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी सैन्याशी लढताना राजेंद्र तुपार यांना वीरमरण आले होते. शहीद तुपारे मराठा लाइट इंन्फंट्री-२२चे जवान होते.

सैन्यात जायचे आधीच ठरवले होते

शहीद तुपारे यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले. त्यानंतर कोल्हापूर येथे त्यांनी आय. टी. आयचे शिक्षण घेतले. त्यानंतर गावातीलच महाविद्यालयात अकरावी व बारावीचे शिक्षण घेतले. आय. टी. आयचे शिक्षण घेतल्यानंतर काही दिवस त्यांनी शिनोळी येथील अॅटलास कंपनीमध्ये काम केले. त्यांना सैन्यात दाखल होण्याची खूप इच्छा होती. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्नही केले. बारावीनंतर ते आय. टी. आयच्या ट्रेडवर ते २००२ साली सैन्यात भरती झाले. तरीही त्यांनी शिक्षण पुढे सुरू ठेवले. सैन्यात सेवा बजावत असताना दुरशिक्षण विभागाअंतर्गत त्यांनी बी. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तुपारे यांचा मोठा मुलगा आदित्य हा सध्या तिसरीमध्ये तर वैभव हा बालवाडीमध्ये शिक्षण घेत आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *