facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / शिर्डी, शिंगणापूरसाठी ऑनलाइन बुकिंग

शिर्डी, शिंगणापूरसाठी ऑनलाइन बुकिंग

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर –जिल्ह्यातील शनी शिंगणापूर व शिर्डी येथे येणाऱ्या नागरिकांना एसटीच्या ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या दोन्ही ठिकाणी एसटीचे तिकीट ऑनलाइन बुक करण्याची सुविधा लवकरच सुरू केली जाणार आहे. यासाठी शिंगणापूर देवस्थानने महामंडळास जागा दिली आहे. तसेच शिर्डी येथेही जागेबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक अशोक जाधव यांनी दिली.
प्रवाशांसाठी तिकीट ऑनलाइन बुकिंगची सुविधा महामंडळाने सुरू केली आहे. बसस्थानकांवर या कामासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. तिकीट बुकिंग करण्यासाठी प्रवाशांना याठिकाणी यावे लागते. जिल्ह्यातील शिंगणापूर आणि शिर्डी या दोन्ही ठिकाणी रोज हजारो नागरिक येत असतात. काही जण खासगी वाहनांनी येतात तर काही मात्र एसटीने येतात. या प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुक करायचे झाल्यास तशी सुविधा येथे उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना नगर किंवा अन्य ठिकाणी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रवाशांची ही अडचण कमी करण्यासाठी एसटीने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. शनी शिंगणापूर देवस्थानने महामंडळास मोफत जागा दिली आहे. या जागेवर आता तिकीट बुकिंग सुरू केले जाणार आहे. शिर्डीमध्येही कार्यवाही सुरू आहे. देवस्थानशी संपर्क साधण्यात येऊन जागेची मागणी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून जागा उपलब्ध झाल्यास तेथेही बुकिंग सुरू केले जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

दिवाळीत एसटीची ‘दिवाळी’

दिवाळी सणाच्या काळात एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी केलेल्या जादा वाहतुकीतून एसटीला जादा उत्पन्न मिळाले आहे. २२ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या दहा दिवसांच्या काळात केलेल्या जादा वाहतुकीतून एसटीस ५२ लाख ७२ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. दिवाळीच्या काळात प्रवाशांनी एसटीला प्राधान्य दिल्याने चांगले उत्पन्न मिळाले असून अजूनही जादा गाड्या सोडल्या जात आहेत.
नगर, मराठवाड्यातील नागरिक नोकरीनिमित्त पुण्याजवळील उपनगरात स्थायिक झाले आहेत. या नागरिकांच्या सोयीसाठी प्रथमच खराडी बायपास येथे तात्पुरते बसस्थानक तयार करण्यात आले आहे. येथूनच नगरला जाण्यासाठी जादा गाड्या दिवाळीच्या काळात सोडल्या जात होत्या. एसटीने प्रथमच घेतलेल्या या निर्णयास प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. दिवाळीच्या साधारण दहा ते बारा दिवसांच्या काळात तब्बल ५०० जादा गाड्या सोडण्यात आल्या. यातून जवळपास ७७ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमास प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिल्याने येथून कायमस्वरुपी गाड्या सोडण्याचे नियोजन नगर विभागाने केले आहे. येथील बसस्थानक कायमस्वरुपी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार कार्यवाही केली जात असल्याचे विभाग नियंत्रक अशोक जाधव
यांनी सांगितले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *