facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / एसएनडीटी कुलसचिवपदी डॉ. सं. ना. भारंबे
13516340_115290022235705_871404053873110509_n

एसएनडीटी कुलसचिवपदी डॉ. सं. ना. भारंबे

आवाज न्यूज नेटवर्क –

 जळगाव – जळगावच्या अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळाच्या महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सं. ना. भारंबे यांची मुंबईच्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एसएनडीटी विद्यापीठाचे सध्याचे कुलसचिव डॉ. शांताराम बडगुजर यांनी सोमवारी दुपारी डॉ. सं. ना. भारंबे यांना फोन करून कुलसचिवपदावर नियुक्ती झाल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर एसएनडीटी महिला विद्यापीठातून नियुक्तीबाबतचा ई-मेल प्राप्त झाला. स्थापनेची १०० वर्षे पूर्ण करणाऱ्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलसचिवपदी पाच वर्षांसाठी डॉ. सं. ना. भारंबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. भारंबे हे गेल्या २८ वर्षांपासून एम. जे. कॉलेजमध्ये ज्ञानदानाचे कार्य करीत होते. या दरम्यान, त्यांना अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळाच्या महिला कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालयात प्राचार्यपदाची संधी मिळाली. यावल तालुक्यातील राजोरे गावचे ते मूळ रहिवासी आहेत.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *