facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / तहसीलसमोर तलाठ्यांचे धरणे
showimageinstory

तहसीलसमोर तलाठ्यांचे धरणे

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – तलाठी सज्जांची व महसूल मंडळाची पुनर्रचना करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सोमवारी काळ्या फिती लावून काम केल्यानंतर संघाने आंदोलन तीव्र केले आहे.
१० नोव्हेंबरला अतिरिक्त कार्यभाराच्या डीएससी तहसीलदारांकडे जमा करणे आणि इतर मागण्या मान्य न झाल्यास १६ नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यभर तलाठी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून सामूहिक रजेवर जातील, असा इशाराही देण्यात आला आहे. ऑनलाइन सातबारामधील अडचणी तत्काळ दूर करण्यात याव्यात, तलाठी, मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देण्यात यावे, अवैध गौण खनिज वसुली या कामातून तलाठी, मंडळ अधिकारी संवर्गास वगळण्यात यावे, तलाठी, मंडळ कार्यालय बांधून देण्यात यावे, मंडळ अधिकारी यांना कार्यालयीन भाडे मंजूर करावे, सरळसेवेची २५ टक्के पदे खात्याअंतर्गत तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यासाठी राखीव ठेवावीत, अव्वल कारकून संवर्गातील पदे मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचारी व मंडळ अधिकारी संवर्गातील अव्वल कारकून सवंर्गातून भरण्यात यावीत या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. औरंगाबाद तहसील कार्यालयासमोरील धरणे आंदोलनात राज्य तलाठी संघाचे सरचिटणीस सतीश तुपे, अनिल ठोंबरे, अनिल सूर्यवंशी, अप्पासाहेब गोराडे, अनिल शिंदे, धनंजय साळवे, रिता पुरी, देवलाल केदारे, योगेश पंडित, पी. एन. बिरारे आदींसह अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

Check Also

news-2

‘केवायसी’ पूर्ततेसाठी स्टेट बँकेची शक्कल

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – कोपरगाव शहरातील स्टेट बँकेच्या ४०० हून अधिक खातेदारांच्या खात्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *