facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार
marriage

तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – दिवाळी नुकतीच सरली असून, येत्या ११ नोव्हेंबरपासून तुळशी विवाह सुरू होत आहेत. त्रिपुरारी पौर्णिमा अर्थात १४ नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाह सुरू राहणार आहे. त्यानंतर लग्नांच्या धुमधडाक्यांना सुरुवात होईल. १६ नोव्हेंबर ते १८ मार्च २०१७ पर्यंत तब्बल ४४ मुहूर्तांवर लग्नांचे बार उडणार आहेत.

यंदाच्या वर्षी प्रबोधिनी एकादशी अर्थात शुक्रवार, ११ रोजी तुळशी विवाहाला प्रारंभ होत आहे. हा विवाह सोहळा कार्तिक पौर्णिमा अर्थात सोमवार, १४ पर्यंत सुरू राहणार आहे. दाते पंचागानुसार बुधवार, १६ नोव्हेंबर रोजी लग्नाचा पहिला मुहूर्त आहे. नोव्हेंबर महिन्यात ५, डिसेंबरमध्ये ११, तर जानेवारी २०१७ मध्ये ७ मुहूर्त आहेत. जानेवारीत पौष महिना येत असल्याने या दिवसांत विवाह होत नाही, मात्र लग्नाची घाई असलेल्या मंडळींसाठी या महिन्यातही लग्नाच्या शुभ तारखा आहेत. फेब्रुवारी महिन्यात ११ आणि मार्चमध्ये १८ तारखेपर्यंत लग्नाचे १० मुहूर्त आहेत. दाते पंचागानुसार १८ मार्चपर्यंत लग्नाचे मुहूर्त आहेत.

असे आहेत मुहूर्त
नोव्हेंबर २०१६ – १६, २१, २३, २५, २६
डिसेंबर २०१६ – १, ३, ४, ५, ६, ८, १४, १८, १९, २०, २४
जानेवारी २०१७ – १७, १८, १९, २०, २३, २४, २९
फेब्रुवारी २०१७ – १, २, ३, ७, १०, १३, १४, १६, १७, १९, २८
मार्च २०१७ – १, २, ५, ६, १०, ११, १४, १५, १६, १८

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *