facebook
Wednesday , December 7 2016
Home / Featured / मलकापुरात शिवसेना राष्ट्रवादी आघाडीचा प्रचार प्रारंभ
shiv-sena-rastrawdi

मलकापुरात शिवसेना राष्ट्रवादी आघाडीचा प्रचार प्रारंभ

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – मलकापूर नगरपालिका निवडणुकीसाठी समविचारींना बरोबर घेत एकत्र आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीने सोमवारी सकाळी विठ्ठल मंदिरा समोर प्रचाराचा प्रारंभ केला. यावेळी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, आघाडीचे नेते आमदार सत्यजित पाटील, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर, ‘शेकाप’चे भाई भारत पाटील, माजी नगराध्यक्ष राजू भोपळे, माजी जि. प. सदस्य हंबीरराव पाटील, पं. स. माजी उपसभापती नामदेवराव पाटील सावेकर यांच्यासह आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

तर भाजप-जनसुराज्य आघाडीने उमेदवारी डावलल्याने नाराज झालेले ‘जनसुराज्य’चे कार्यकर्ते माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने यांनी आपली अपक्ष उमेदवारी पाठीमागे घेत शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला पाठींबा व्यक्त केल्याबद्दल आघाडीच्या नेत्यांनी त्यांचा सत्कार केला. प्रचार प्रारंभाच्या निमित्ताने या आघाडीने कोणतीही घोषणा अथवा भाषणबाजी करण्याचे कटाक्षाने टाळत उपस्थितांसमोर आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची ओळख परेड घेतली.

आघाडीचे प्रभागनिहाय अधिकृत उमेदवार असे :-प्रभाग क्र. १ अ :- कु. प्रियांका राजू भोपळे , ब :- संजय बळवंत मोरे, प्रभाग क्र. २ अ :- शौकत महम्मद कळेकर , ब :- पद्मजा दिलीप गुरव, प्रभाग क्र. ३ अ :- नंदकुमार नागवेकर , ब :- नीता सु. पवार, प्रभाग क्र. ४ अ :- माया पाटील ब :- अमर खटावकर, प्रभाग क्र. ५ अ :- शुभांगी कोकरे-देसाई ब :- बाबासो तातोबा पाटील (विद्यमान नगराध्यक्ष), प्रभाग क्र. ६ अ :- प्रल्हाद ब :- संगीता सुधाकर पाटील, प्रभाग क्र. ७ अ :- बाबूराव चांदणे ब :- प्रिया विजय कुंभार, प्रभाग क्र. ८ अ :- शालन वि. सोनावळे ब :- संगीता विष्णू कुंभार, प्रभाग क्र. ८ क :- सुहास सुरेश पाटील.

नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे उमेदवार म्हणून ओळख परेडच्या अखेरीस आघाडीने अपेक्षेप्रमाणे प्रकाश तातोबा पाटील यांच्या नावाची घोषणा केली. सर्वच उमेदवारांनी उपस्थितांना अभिवादन केले. यानंतर लगेचच आघाडीचे सर्व उमेदवार आपआपल्या प्रभागातील मतदारांच्या गाटीभेटीसाठी प्रचारात सक्रीय झाले.

……

चौकट

आघाडीत एकाच घरातील तिघांना स्थान

यावेळी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा करताना मलकापूर पालिकेत दीर्घकाळ पदाधिकारी किंवा सत्तेत राहिलेले राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील यांना या आघाडीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार पसंती देतानाच त्यांचे बंधू विद्यमान नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील व सुहास सुरेश पाटील या दोघांना अनुक्रमे प्रभाग क्र. ५’ब’ व ८’क’ मधून नगरसेवकपदाची उमेदवारी दिली आहे.

अपक्षांची मनधरणी

दरम्यान, निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी कायम ठेवणाऱ्या उमेदवारांची दोन्हीकडून मनधरणी सुरु असून उमेदवारी मागे घेण्यासाठी यातील काही उमेदवार ‘स्वीकृत’ साठीचा शब्द घेण्याबरोबरच अन्यही मागण्या पुढे करत आहेत. माघारीला अद्याप चार दिवसांचा अवधी असल्याने अपक्ष व बंडखोरांचे रुसवे-फुगवे दूर करताना दोन्ही आघाडी प्रमुखांसह नेत्यांची तारांबळ उडणार आहे.

Check Also

img

विविध संघटनांतर्फे बाबासाहेबांना अभिवादन

विविध राजकीय पक्ष, संघटनांसह शाळा-महाविद्यालयांत विविध कार्यक्रम, उपक्रमांतून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *