facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / विद्यार्थिनींना मध्यरात्रीनंतर लायब्ररीत प्रवेशबंदी
02

विद्यार्थिनींना मध्यरात्रीनंतर लायब्ररीत प्रवेशबंदी

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – शिक्षणाचं माहेरघर अशी ख्याती असलेल्या पुण्यात विद्यार्थी व विद्यार्थिनीमध्ये भेद करणारा निर्णय एका मेडिकल कॉलेजने घेतला आहे. मध्यरात्रीनंतर विद्यार्थिनींना अभ्यासासाठी लायब्ररीत येता येणार नाही, असा निर्णय घेतल्याने याविरोधात विद्यार्थिनींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पुण्यातील प्रसिद्ध बेहरामजी जीजीभाई मेडीकल (बीजे) कॉलेजने हा निर्णय घेतला आहे. परीक्षा तोंडावर असताना कॉलेजने हा निर्णय घेतल्याने विद्यार्थींनींनी या निर्णयाविरोधात आक्षेप घेतला आहे. विद्यार्थिनींना मध्यरात्रीनंतर प्रवेशबंदी करणाऱ्या कॉलेजने विद्यार्थ्यांना मात्र लायब्रेरीत रात्रभर अभ्यासासाठी परवानगी दिली आहे. बीजे कॉलेजचे अधिष्ठाता अजय चंदनवाले यांनी नुकताच याबाबत आदेश जारी केला केला आहे. या नव्या निर्णयामुळे विद्यार्थिनींना रात्री सव्वा अकरा वाजताच लायब्ररीतून बाहेर काढले जाते व त्यानंतर पुन्हा प्रवेश दिला जात नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सक्षम अहवालाच्या नियमानुसार कुठल्याही कॉलेजमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी असे स्वतंत्र नियम असू शकत नाहीत, असे संतप्त विद्यार्थिनींनी म्हटले आहे.

कॉलेजचे अधिष्ठाता अजय चंदनवाले यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. अनेक विद्यार्थिंनी रात्री दीडनंतर अभ्यासाला लायब्रेरीत येत असल्याचे आढळून आल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा निर्णय विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. लवकरच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असा निर्णय घेण्यात येईल, असेही चंदनवाले यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, विद्यार्थिनींचे हॉस्टेल आणि लायब्रेरी यांच्यात साधारणपणे एक किलोमीटरचे अंतर आहे, त्यामुळे विद्यार्थिनींनी लवकर रूमवर पोहोचणे सुरक्षेच्या दृष्टीने चांगले असल्याचं मत एका स्थानिक महिला डॉक्टरनं व्यक्त केलं.

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *