facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / Featured / जनावरांचा बाजार हलविण्यास बाजार समितीचा विरोध

जनावरांचा बाजार हलविण्यास बाजार समितीचा विरोध

आवाज न्यूज नेटवर्क –

पंढरपूर – (प्रतिनिधी – नागनाथ सुतार) – पंढरपूरच्या  कार्तिकी यात्रेमध्ये भरणारा जनावरांचा बाजार शहरा बाहेर हलवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी दिल्या .यामुळे पंढरपूर कृषी उत्पन बाजार समीती व पशु पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे .कारण पंढरपूरचा विठ्ठल हा आठरा पगड जातींचा देव या विठ्लाच्या दर्शनासाठी येणारा वारकरीच शेतकरी असतो. या वारीच्या निमिताने तो विठ्लाच्या दर्शना बरोबर आपल्या शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करतो. जनावरे विकत घेणे विकणे हे व्यवहार करीत असतो .परंतु हा बाजार गावातून लांब गेल्यावर त्याची गेरसोई .होणार आहे . बारा ते पंधरा हजार जनावरे या बाजारात विक्रीसाठी येतात .त्यापासून दहा कोटीच्या  आसपास  बाजार समितीचा टर्नवर होतो .यापूर्वी घोडेबाजारही असाच शहराबाहेर हलविण्यात आला आणि तो बंद पडला. तसा जनावरांचा बाजार बंद पाडणार का? असा प्रश्न आज बाजार समितीला पडलाय .तसेच  येत्या चार दिवसांत जनावरांच्या बाजारासाठी वाखरी येथे सोयीसुविधा देणे शक्य नाही. त्यामुळे बाजार हलविण्याचा प्रशासनाने कोणताही प्रयत्न करू नये. पुढील वर्षी शेतकरी, व्यापारी व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून बाजार हलविण्याचा निर्णय घ्यावा, असे बाजार समितीचे सभापती पोपट रेडे यांनी सांगितले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *