facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / अहमदनगर / आवश्यक तेथे उघडणार राष्ट्रीयकृत बँक शाखा

आवश्यक तेथे उघडणार राष्ट्रीयकृत बँक शाखा

सामान्य माणसाला सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी त्याला बँकांशी जोडण्याचे काम सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून ग्रामीण भागात आवश्यकता असेल तेथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उघडण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवालजी यांनी व्यक्त केले.

नगर अर्बन बँकेच्या बालम टाकळी येथील शाखेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा व खासदार दिलीप गांधी यांच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या मुस्लिम स्मशानभूमीच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला, त्या वेळी मेघवालजी बोलत होते. भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसेन, भाजप राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजु, खासदार दिलीप गांधी, आमदार मोनिका राजळे आदी या वेळी उपस्थित होते.

मेघवालजी म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने सुरक्षा विमा, जनधन, मुद्रा, उज्ज्वल या योजना सुरू केल्या. त्यामुळे सामान्य माणसाला बँकिंग व्यवहाराची माहिती मिळण्याबरोबरच विविध योजनांचा लाभ घेता आला. मुद्र्रा योजनेमुळे आज लाखो बेरोजगार तरुण स्वतःच्या पायावर उभे राहीले आहेत. ग्रामीण भागातील व्यापारीपेठ पुन्हा एकदा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा उघडण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

शाहनवाज हुसेन म्हणाले, अच्छे दिन कधी येणार? असे विरोधक विचारत होते; मात्र, पाकच्या एका गोळीला आता हिंदुस्थानच्या दहा गोळीने उत्तर दिले जाते हे खरे अच्छे दिन आहेत.

प्रसाद बेडेकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष शैलेश मुनोत यांनी आभार मानले.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *