facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / Featured / कोपर्डीशेजारच्या कुळधरणला पोलीस चौकी

कोपर्डीशेजारच्या कुळधरणला पोलीस चौकी

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – कोपर्डीची घटना घडल्यानंतर कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे नवीन पोलिस चौकी (पोलिस दूरक्षेत्र) उभारण्यास गृह विभागाने मंजुरी दिली आहे. या ठिकाणी एक पोलिस अधिकारी व पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती जलसंधारणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली आहे.

कर्जत तालुक्यात एक पोलिस स्टेशन असून, त्या अंतर्गत ११८ गावे आहेत. त्यामुळे येथील कायदा व सुव्यवस्था सुरुळीत राहण्याच्या दृष्टीने कुळधरण येथे नवीन पोलिस चौकीची मागणी ग्रामस्थांकडून होती. त्यानंतर कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार होऊन तिची हत्या झाली होती. या गावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिल्यानंतर कुळधरण पोलिस चौकी स्थापन करण्याबाबत चर्चा करून तसेच आदेश दिले होते. पालकमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्री यांना कुळधरणला पोलिस चौकी उभारण्याची विनंती केली होती. त्यानुसार पोलिस महासंचालकांनी या गावात पोलिस चौकी मंजूर केली आहे. नव्याने स्थापन होत असलेल्या कुळधरण पोलिस चौकीत एक पोलिस उपनिरीक्षक एक, पाच पोलिस कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच पोलिस चौकीसाठी जागेचा शोध घेऊन लवकरच पोलिस चौकीचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री शिंदे यांनी दिली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *