facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / नागपूर / लग्नाआधीच वाग्दत्त वधूचा हुंडाबळी

लग्नाआधीच वाग्दत्त वधूचा हुंडाबळी

लग्न पाच दिवसांवर आले असतानाच वराच्या परिवाराकडू अधिकच्या हुंड्याच्या मागणीला कंटाळून वाग्दत्त वधूने आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री आमगाव तालुक्यातील रिसाया येथे घडली. संध्या लोकचंद बारई (वय २५) असे मृत तरुणीचे नाव आहे. नागपूर येथे शिक्षक असलेल्या प्रदीप शंकरराव भोंगेकर (वय ३२, वय, रा. भोंगेकर रा. उमरेड रोड, सर्वश्रीनगर) याच्याशी १३ नोव्हेंबर रोजी तिचा विवाह होणार होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आमगाव तालुक्यातील रिसाया येथील लोकचंद गजानन बारई यांची दुसरी मुलगी संध्या हिचा विवाह नागपूर येथील शिक्षक असलेल्या प्रदीप शंकरराव भोंगेकर याच्याशी ठरला. विवाहासाठी १३ नोव्हेंबरला मुहूर्तही काढण्यात आला. भावी संसाराचे स्वप्न रंगवून लग्नाच्या मुहूर्ताची वाट बघणाऱ्या भावी वधूला मात्र, तिच्या होणाऱ्या पतीकडून वारंवार लग्नाआधी हुंड्याची मागणी करण्यात येत होती. भावी पती प्रदीपकडून संध्याच्या कुटुंबीयांकडे मागणीच्या विधीचा खर्चही मागण्यात येत असल्याने संध्याचे कुटुंबीय आधीच खचले होते. प्रदीप याने अगोदरच वऱ्हाड्यांसाठीच्या बसेसचा खर्च, एसी, सोने व इतर साहित्याची मागणी केली होती. यात संध्याच्या कुटुंबीयांनी प्रदीपच्या मागणीप्रमाणे बसेस तसेच एसीची मागणी पूर्ण केली होती. तर, सहा तोळे सोने व सोन्याचा गोफ देण्यासाठी तयारी केली होती. लग्नाची तयारी म्हणून संध्याच्या पालकांनी तिच्या भावी जीवनात लागणाऱ्या अनेक वस्तूंची खरेदी केली होती.

शिक्षणाची आवड असणारी संध्या हरपली

मृतक संध्याचे कुटुंब उच्चशिक्षित आहे. वडील लोकचंद बारई हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत, तर दोन भाऊही डॉक्टर व इं‌जिनीअर आहेत. संध्या स्वतः फार्मसी, डीटीएड व डीएमएलटीसह पुढेही विविध अभ्यासक्रम करण्यासाठी इच्छुक होती. निरंतर शिक्षणातून नावलौकिक करण्याचे स्वप्न बाळगणारी संध्या हरपली, अशी शोकाकुल भावना तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *