facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / औरंगाबाद / वाहतूक व्यवस्थेअभावी कलावंतांचे हाल

वाहतूक व्यवस्थेअभावी कलावंतांचे हाल

राजभवनातर्फे आयोजित इंद्रधनुष्य महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू आहे. राज्यभरातील विविध विद्यापीठातील विद्यार्थी महोत्सवात सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांना एका स्टेजपासून दुसऱ्या स्टेजपर्यंत जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली नाही. सोमवारी तर एकांकिका स्पर्धेसाठी आवश्यक त्या साहित्याचे ओझे डोक्यावर वाहून नेण्याची वेळ आली.
इंद्रधनुष्यसाठी राज्यातील २० विद्यापीठातील ८०० विद्यार्थी कलावंत इंद्रधनुष्यसाठी विद्यापीठात आलेले आहेत. महोत्सवातील विविध कलाप्रकारांचे चार स्टेजवर सादरीकरण सुरू आहे. मुख्य स्टेज हे नाट्यगृहात आहे. त्याला देवगिरी मंच असे नाव देण्यात आले आहे. त्यासह प्राणीशास्त्र विभागात ‘प्रतिष्ठान’, सीएफसी सभागृहात ‘वेरूळ’, तर ललितकला विभागात ‘अजिंठा’ हे व्यासपीठ उभारण्यात आले आहेत. महोत्सवासाठी आलेल्या विद्यार्थिनींची निवासाची व्यवस्था नवीन वसतिगृहात तर मुलांच्या निवासाची व्यवस्था क्रीडा विभागाच्या बाजूला असलेल्या तात्पुरत्या वसतिगृहात निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कलावंत विद्यार्थ्यांना एका व्यासपीठापासून दुसऱ्या व्यासपीठापर्यंत पायपीट करत जावे लागते. नाट्यगृहपासून इतर तीन व्यासपीठापर्यंतचे अंतर दूर आहे. तर निवास व्यवस्थेपर्यंतचेही अंतर दूर आहे. त्यामुळ विद्यार्थ्यांची अडचण होते. विविध कलाप्रकारांसाठी आवश्यक ते साहित्याची ने आण करण्यासाठी विद्यार्थ्यांची तारांबळ उडाल्याचे दिसले. सोमवारी एकांकिका स्पर्धा होत्या. एका विद्यापीठाच्या विद्यार्थी कलावंताना एकांकिकेसाठी लागणारे साहित्याचे ओझे वाहून न्यावे लागले.

सूचनानंतरही दुर्लक्ष
महोत्सवासाठी राज्यपाल कार्यालय विद्यापीठाला विविध सूचना करते. यामध्ये वाहतूक व्यवस्थेच्या सूचनेचा समावेश असल्याचे सूत्रांनी ‘मटा’ला सांगितले. सूचनेनंतरही विद्यापीठ प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आल्याचे कळते.

Check Also

गोवंश हत्याबंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान

गोवंश हत्याबंदी दुरुस्ती कायदा रद्द करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *