facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / विद्यापीठाला निधीची प्र‌तीक्षा

विद्यापीठाला निधीची प्र‌तीक्षा

शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासासाठी ५० कोटी रुपये निधी देण्याची जाहीर केले होते. विद्यापीठ प्रशासनाने तब्बल ३० ते ३५ वेळा पत्रव्यवहार करुन केवळ सव्वा तीन कोटी रुपयांना निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या वर्धापनदिनापर्यंत यातील काही रकम मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील नीती आयोगाचे अधिकारी, अर्थ आणि शिक्षण खात्याची एकत्र‌ित बैठक घेणार असल्याचे विद्यापीठाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

१८ नोव्हेंबर, १९६२ रोजी शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. स्थापनेवेळी ३४ कॉलेज व विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १४०० होती. २७१ कॉलेज आणि दोन ते अडीच लाख विद्यार्थी संख्येमुळे सध्या विद्यापीठाचा मोठा विस्तार होत आहे. दक्षिण महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात अमुलाग्र बदल करण्यामध्ये विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. काळानुरुप बदल करत शिवाजी विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यापीठाचा प्रगतीचा आढावा आणि सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मंत्र्यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमादरम्यान माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी ५० निधी देण्याचे जाहीर केले होते. यानंतर विद्यापीठाने विविध विकासकामांचा आणि साहित्य खरेदीचा आराखडाही सादर केला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात अडीच कोटीचा निधीही प्राप्त झाला, मात्र त्यानंतर विद्यापीठ निधीसाठी सातत्याने पत्रव्यवहार करत आहे.

विद्यापीठात राबवण्यात येत असलेल्या रुसातंर्गत ‘ग्यान’ प्रकल्पाचे उद्‍घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये बीसीयूडी डॉ. डी. आर. मोरे यांनी सुवर्णमहोत्सवी निधीचा आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला होता. डॉ. मोरे यांच्या भाषणाचा संदर्भ घेत पालकमंत्री पाटील यांनी निधी देण्याची घोषणा केली होता. त्यानंतर पुन्हा विद्यापीठ प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू केला. पालकमंत्री यांनी भेटीदरम्यान एकाचवेळी निधी मिळणार नसल्याने टप्प्याटप्प्याने निधी देण्याचे नियोजन करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार विद्यापीठाने तयारी करुन त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पालकमंत्री व्यस्त असल्याने पुन्हा ही प्रक्रिया रखडली आहे. पण निधीचा प्रश्न निकालात काढण्यसाठी निती आयोग, अर्थ व शिक्षण खात्याची एकत्रीत बैठक घेण्याचे नियोजन करत आहेत. यासाठी स्वत: बीसीयूडी डॉ. मोरे प्रयत्न करत आहेत.

म्युझियम कॉम्पलेक्स स्वनिधीतून

निधीची उपलब्धता वेळेत होत नसल्याने म्युझियम कॉम्पलेक्स, राजर्षी रिसर्च सेंटर, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट व अध्यासन केंद्र, स्कूल ऑफ नॅनो सायन्स केंद्राची कामे विद्यापीठ स्वनिधीतून करण्यास सुरुवात केली आहे.

सुवर्णमहोत्सवी निधी मिळण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. सरकारकडून येणारा निधी एकदम मिळणार नसला, तरी टप्प्याटप्प्याने निधी देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यासाठी पुढील आठवड्यात अर्थ, शिक्षण व नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांची एकत्रीत बैठक होणार आहे.

डॉ. डी. आर. मोरे, बीसीयूडी

असा मिळणार होता निधी

२०१२-१३ : पाच कोटी

२०१३-१४ : १८ कोटी ६३ लाख

२०१४-१५ : १८ कोटी ७० लाख

असा मिळाला निधी

२०१२-१३ : २ कोटी ४० लाख

२०१३-१४ : ३९ लाख ९९ हजार पैकी २१ लाख विद्यापीठ फंडात वर्ग

Check Also

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *