facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / अहमदनगर / संगमनेरला काँग्रेसच्या सुनंदा दिघे बिनविरोध

संगमनेरला काँग्रेसच्या सुनंदा दिघे बिनविरोध

येथील नगरपालिका निवडणुकीत माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची विजयी घोडदौड सुरू झाली असून प्रभाग ४ ब मधून काँग्रेसच्या उमेदवार सुनंदा मच्छिंद्र दिघे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी विकासाचा मुद्दा घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे. केवळ निवडणुकीपुरते येणाऱ्या काही मंडळींना आता जनता थारा देत नाही. अशातच काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेर शहरातून प्रभाग ४ ब मधून संगीता राजू गायकवाड यांनी माघार घेतल्याने काँग्रेसच्या सुनंदा मच्छिंद्र दिघे यांची बिनविरोध निवड होऊन काँग्रेसच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध असणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांना शहरातील जनतेने कायम साथ दिली असून यावेळेसही परंपरा जपली जाणार आहे. जिल्ह्यात आदर्श शहर म्हणून संगमनेरचा गौरव असून सततच्या विकास कामांमुळे नगरपालिकेस अनेक रायस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.

ही निवडणूक काँग्रेसचे उमेदवार विकासकामांच्या जोरावर मोठ्या मताधिक्याने जिंकण्याचा दावा करत आहेत. सुनंदा दिघे यांच्या बिनविरोध निवडीने काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. तर विरोधकांची सुरुवातीपासून पिछेहाट व्हायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *