facebook
Sunday , December 11 2016
Home / मुंबई / एटीएमवर नागरिकांची झुंबड
atm

एटीएमवर नागरिकांची झुंबड

५०० आणि १ हजाराच्या नोटा बंद करण्यासंबंधी पंतप्रधानांनी घोषित केलेल्या निर्णयानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पाचशे व हजारच्या नोटा फक्त बँका व पोस्ट ऑफीसमध्ये बदलून मिळणार असल्यानं नोटा बदलण्यासाठी लोकांनी काल रात्री उशिरापर्यंत एटीएम केंद्रांवर रांगा लावल्या होत्या.

काळा बाजार व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरकारनं ५०० व १०००च्या नोटा व्यवहारातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी रात्री ही घोषणा केली. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि एकच गोंधळ उडाला. या घोषणेनंतर सर्व बँका व एटीएम एक दिवस बंद ठेवण्याच्या सूचना सरकारनं दिल्यामुळं आपल्याजवळच्या नोटा बदलण्यासाठी लोकांनी एटीएम केंद्रांवर धाव घेतली. त्यामुळं काल मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्रासह देशभरात एटीएम केंद्रांवर एकच झुंबड उडाली होती. लोकांच्या गर्दीमुळं अनेक ठिकाणी एटीएम मशीनमधील १००च्या नोटा संपल्या. तर, काही लोकांनी बॅगा भरून पैसे डिपॉझिट करण्यासाठी आणले होते. अनेक ठिकाणी गर्दीमुळं वादविवादही झाल्याचं समजतं.

पेट्रोल पंप बंद

55320592

पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे भांबावलेल्या अनेक नागरिकांनी पेट्रोल पंपांवर पाचशे व हजार रुपयांच्या नोटा वटविण्याचा प्रयत्न केला. पंपांवर अनेकजण पन्नास किंवा शंभर रुपयांचे पेट्रोल भरून पाचशे रुपयांची नोट पुढे करीत होते. त्यांना चारशे रुपये परत देताना पंपचालकांची पंचाईत झाली. त्यामुळे अनेक पंपचालकांनी रात्रीच थेट पेट्रोल पंप बंद केले.

Check Also

jpg

सीएसटी, विमानतळाच्या नावात आता ‘महाराज’

मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी विमानतळ’ आणि ‘छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस’ या नावांमध्ये ‘महाराज’ हा शब्द समाविष्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *