facebook
Saturday , December 10 2016
Home / नागपूर / चंद्रपूर सर्वाधिक प्रदूषित नाही!
polution

चंद्रपूर सर्वाधिक प्रदूषित नाही!

दिल्लीत प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली असताना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाइटवरून देशात चंद्रपूरचा वायू गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स) ८७४ दाखविला जात होता. त्यामुळे देशात दिल्ली नव्हे तर चंद्रपूर सर्वाधिक प्रदूषित असल्याचे समोर आल्याने खळबळ माजली होती. मोजणी करणाऱ्या यंत्राची एक फिल्टर टेप तुटल्याने हा घोळ झाला. संध्याकाळपर्यंत त्यात दुरुस्ती झाल्याने अखेर त्यावर पडदा पडला. दरम्यान, राज्यात प्रदूषणात पुणे अव्वल असल्याचे समोर आले आहे.

दिवाळी हा खरा तर आनंदसण… अंधार जीवनात सकारात्मकता पेरणारे प्रकाशपर्व. मात्र, मागील दिवाळीत फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे देशाच्या अनेक भागात जीवघेण्या प्रदूषणाची पातळी कित्येक पटीने वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. ती बाब लक्षात घेता यावेळी तरी निसर्गसृष्टीतील अनेक जीवांचा कर्दनकाळ ठरणाऱ्या प्रदूषणात भर घालणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. त्यासाठी मोठ्या शहरात फटाक्यांच्या आवाजासह घातक रसायनांचीही चाचणी घेतली गेली. त्यामुळे प्रदूषणावर काही प्रमाणावर आळा बसल्याचे बोलले जात होते. पण दिल्लीत प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्यावर रविवारी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाइटवरून देशात चंद्रपूरचा वायू गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स) ८७४ दाखविला जात होता. हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे खळबळ उडाली. नागरिकही भयभीत झाले. चंद्रपूर येथील राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी याची धावपळ सुरू झाली. ‘इन्व्हायरोटेक’ या एजन्सीला प्रदूषणाच्या नियमित मोजणीची जबाबदारी देण्यात आली आहे. पण मोजणी करणाऱ्या यंत्राची एक फिल्टर टेप तुटल्याने हा घोळ झाला अशी कबुली प्रदूषण नियंत्रण विभागाचे सहसंचालक विद्यानंद मोटघरे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाइटवरून देशात चंद्रपूरचा वायू गुणवत्ता निर्देशांक चुकीने (एअर क्वालिटी इंडडेक्स) चुकीचा म्हणजे ८२४ दाखविला जात होता. मागील तीन दिवसात दोनदा असा घोळ झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी दुपारी तो ४२० दाखवला जात होता. जागतिक पातळीवर वायू गुणवत्ता निर्देशांक फार मोठा मानला जात होता. मात्र संध्याकाळपर्यंत त्यात दुरुस्ती होत अखेर त्यावर पडदा पडला. मात्र मागील काही दिवसात चंद्रपुरात धूळकण व धुरात मोठी वाढ झाली आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.

दरम्यान, राज्यात प्रदूषणात पुणे टॉप दिसून आले आहे. पुणे येथील वायू गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स) २३९ होता. हा मध्यम असला तरी ही पुण्यासाठी धोक्याची घंटा आहे असे जाणकारांचे मत आहे. हिवाळ्यात वायूवर जात नाही. त्यामुळे प्रदूषणाची मात्रा जास्त दिसते असे सूत्रांनी स्पष्ट केले.

–राज्यातील टॉप (वायू गुणवत्ता निर्देशांक)
पुणे-२३९
डोबिवली-१९४
चंद्रपूर-१७७
नाशिक-१५४
नागपूर-१४३

Check Also

news-6

लहान मुलांसाठी काम करायचेय

आवाज न्यूज नेटवर्क – नागपूर – तुरुंगात येणारी प्रत्येकच व्यक्ती सराईत गुन्हेगार नसते. एखाद्या बेसावध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *