facebook
Monday , December 5 2016
Home / जळगाव / दहा हजार घरांत डेंग्यूच्या अळ्या
dengue

दहा हजार घरांत डेंग्यूच्या अळ्या

शहरात डेंग्यूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सप्टेंबर महिन्यापासून सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात प्रत्येक घरातील पाण्याची भांडी व तापाच्या रुग्णांची माहिती जमा करण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांत शहरातील सुमारे १० हजार घरांमधील पाण्याच्या साठ्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या शहरात ७१५ तापाचे संशयित रुग्ण आहेत.

जळगाव शहरात गेल्या चार महिन्यांपासून डेंग्यूची साथ पसरली आहे. शहरातील अनेक भागात आजदेखील साचलेल्या कचऱ्याची समस्या कायम आहे. त्यात साफसफाई कर्मचारी दररोज येत नाही, आरोग्य निरीक्षक ऐकत नाहीत, घंटागाड्या बंद आहेत, अनेक भागात दैनंदिन साफसफाईचा बोजवारा वाजला आहे. यामुळे अनेक भागात यामुळे डेंग्यू सदृश आजारांची साथ पसरली आहे. आतापर्यंत डेंग्यूमुळे ५ ते ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिकेने याची दखल घेऊन दि. १८ सप्टेंबर २०१६ पासून जळगाव शहरातील सर्व घरांच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात केली होती. त्यातच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्या भागात फवारणी, धुरळणी व अबेटींग अशा उपाययोजना राबविल्या जात आहेत. तसेच घराघरात जाऊन महापालिकेचे कर्मचारी घरातील पाण्याच्या साठ्यांची तपासणी करीत आहेत. तेथील ज्या घरांमधील पाण्याच्या साठ्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून येत आहेत. त्यांना तातडीने हे पाणीसाठे कोरडे करण्याच्या सूचना तसेच साठ्यांमध्ये अळीनाशके टाकण्यात येत आहेत.

७१५ तापाचे संशयित

या अहवालात जळगाव शहरातील ९७ भागात तापाचे ७१५ संशयित रुग्ण आढळल्याची देखील नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे ९९२ जणांच्या तापाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात महापालिकेच्या मलेरिया विभागाने १८ रक्ताचे नमूने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी १० नमूने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आता यावर महापालिकेने तातडीने तोडगा काढत प्रतिबंधात्मक उपाय करायला हवे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Check Also

aawaz-news-image

पुरुषोत्तम करंडकाच्या तयारीला वेग

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – येत्या ३ ते ४ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पुरुषोत्तम करंडक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *