facebook
Wednesday , December 7 2016
Home / मुंबई / निवडणुकीत आपट्याची पानं वाटणार का?: राज ठाकरे
raj

निवडणुकीत आपट्याची पानं वाटणार का?: राज ठाकरे

भ्रष्टाचार व काळ्या पैसा खणून काढण्यासाठी मोदी सरकारनं पाचशे व एक हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसनं मोदींच्या या निर्णयावर टीका केली असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावरून भाजपला खोचक टोला हाणला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप आपट्याची पानं वाटणार आहे का, असा सवाल राज यांनी केला आहे.

पुढील सहा महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, तर देशातील काही राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या काळात मतदारांना भुलवण्यासाठी अनेक ‘अर्थपूर्ण’ व्यवहार होत असल्याचं सांगितलं जातं. यासाठी काळ्या पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या मोठ्या नोटा बाद करण्याच्या निर्णयामुळं निवडणुकीच्या ‘अर्थकारणा’वर परिणाम होणार आहे. तोच धागा पकडून राज यांनी भाजपला टोला हाणला आहे.

‘सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागतच करतो. जो काही निर्णय आहे, तो ठीक आहे, पण येणाऱ्या नगरपालिका निवडणुका, स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आपट्याची पाने वाटणार आहेत काय?’ अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

Check Also

news-15

भारतीय कलात्मकतेची देखणी झलक

आवाज न्यूज नेटवर्क – मुंबई – भारतीयांच्या रोजच्या जगण्यामध्येसुद्धा कलासौंदर्य जपण्यात आले होते. भांड्याकुंड्यांपासून केशालंकार, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *