facebook
Saturday , December 3 2016
Home / औरंगाबाद / पुरातन पूल पाडला; नहर तोडली
showimageinstory

पुरातन पूल पाडला; नहर तोडली

भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी फाजलपुरा येथील सुमारे ४०० वर्ष जुना पूल पाडण्याचा महाप्रताप कंत्राटदाराने केला. यावेळी जेसीबीच्या धक्क्याने पुरातन नहर तुटली. या विध्वंसक कृत्याने स्थानिकांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी काम बंद पाडले.
भूमिगत गटार योजनेचे काम महापालिकेतर्फे खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या माध्यामतून करून घेतले जात आहे. शहराच्या विविध भागात या कंपनीने ड्रेनेज लाइन टाकली. प्रामुख्याने नाल्यातून ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम करण्यात आले. फाजलपुऱ्यातही कंपनीने काम सुरू केले. या भागातून वाहणाऱ्या नाल्यावर मोठा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाच्या बांधकामातून नहरीचे पाइप देखील गेले आहेत. याच पुलाखालून ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी सुरू केले. पाइप टाकण्यासाठी पुलाची एक बाजू जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यास सुरुवात केली. तेव्हा फाजलपुरा येथील नागरिक रस्त्यावर आले. त्यांनी भूमिगत गटार योजनेच्या कामाला विरोध केला. मलिक अंबरच्या काळातला हा पूल असून, पुलाच्या खालून नहरीचे पाइप गेले आहेत. हा पूल शहराचा ऐतिहासिक ठेवा आहे. त्यामुळे तो पाडणे योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. दरम्यानच्या काळात महापालिकेच्या हेरिटेज कमिटीच्या सदस्य प्रा. दुलारी कुरैशी देखील दाखल झाल्या. त्यांनीही भूमिगत गटार योजनेच्या कामाला आक्षेप घेतला. कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी देखील आले. त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काम थांबवण्याचे आदेश दिले. दुपारी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनीही भेट दिली. परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांनीही काम थांबवण्याचे आदेश दिले.

बायपास करण्याचे होते ठरले
पूल पाडून ड्रेनेज लाइन न टाकता पुलाला बायपास करून ड्रेनेज लाइन टाकण्याची सूचना महापालिकेतर्फे कंपनीला देण्यात आली होती, पण कंपनीने ही सूचना न मानता थेट पूल पाडूनच ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू केले. त्यामुळे चेलिपुरा ते जिल्हाधिकारी कार्यालय हा रस्ता रहदारीसाठी बंद झाला आहे.

Check Also

news-13

ऑरिकमधील प्लॉटसाठी ८७१ जणांची नोंदणी

आवाज न्यूज नेटवर्क – औरंगाबाद – दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीमध्ये (ऑरिक) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *