facebook
Thursday , December 8 2016
Home / जळगाव / मंजूर रकमेसाठी कामगारांची वणवण

मंजूर रकमेसाठी कामगारांची वणवण

शहरातील बंद पडलेल्या खान्देश मील कामगारांना त्यांच्या हक्काची अन्य रकमेचा परतावा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू झाला आहे. ही रक्कम मिळण्यासाठी येथील कामगार आयुक्त कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. कार्यालयाने मात्र अर्ज संपूर्ण प्रक्रिया करून ओळख पटवून झाल्यानंतरच दिले जात असल्याचे सांगत आतापर्यंत १,३४५ कामगारांना अडीच कोटींचे वाटप केले गेल्याचे मंगळवारी (दि. ८) सायंकाळी सहाय्यक कामगार आयुक्त आर. जी. इळवे यांनी सांगितले.

१९८४ मध्ये खान्देश मील बंद पडल्यानंतर प्रॉव्हिडंड फंडशिवाय अन्य रक्कम संबंधित कंपनीकडून कामगारांना घेणे होते. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आणि कामगारांचे संबंधित रक्कम देण्याचे आदेश दिले गेले. २,५९६ कामगारांचे क्लेम मान्य केले गेले आहेत. २,५९६ कामगारांपैकी १,८५० कामगारांनी क्लेम मागण्यासाठी अर्ज केले यापैकी १,३४५ अर्ज मंजूर झालेले असून त्यांना अडीच कोटींचे वाटप झाल्याचे इळवे यांनी पत्रकारांना सांगितले.

रक्कम कुणाला द्यायची?

क्लेमची रकम देताना संबंधित व्यक्ती ही मील कामगार होती याचा पुरावा देणे गरजेचे असते. अनेक जण पुरावा देऊ शकत नाही. तसेच अनेक कामगारांचे निधन झाले असल्याने क्लेमची रक्कम कुणाला द्यायची हा प्रश्न उभा राहतो. ती मागण्यासाठी नंतर अनेक वारस आले आणि कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे अडचण निर्माण होत असते तसेच आलेले अर्ज कंपनीचे वकील आणि कामगार आयुक्त यांच्या बैठकीत मंजूर होतात. सामान्यत: पन्नासचा लॉट असतो. एखादा अर्ज आला तर तो लगेच मंजूर होत नाही, त्यामुळे कामगारांची वणवण होते, असेही इळवे यांनी मान्य केले.

Check Also

आदिवासी तडवी समाजाचा मोर्चा

तालुक्यातील रसलपूर येथील रहिवासी मुबारक तडवी हा जळगाव येथील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात शिकत होता. तो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *