facebook
Sunday , December 11 2016
Home / जळगाव / सोनोग्राफीच्या दोन नव्या केंद्रांना मंजुरी

सोनोग्राफीच्या दोन नव्या केंद्रांना मंजुरी

जळगाव : जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटर्स तसेच अन्य बाबींकरिता मंगळवारी (दि. ८) पीसीपीएनडीटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी दोन नव्या केंद्रांना मंजुरी देण्यात आली.

बैठकीत जिल्ह्यातील सोनोग्राफी क्रेंद्र नोंदणीसाठी ३ प्रस्ताव आले. त्यापैकी २ क्रेंद्रांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर २ सोनोग्राफी क्रेंद्रांच्या नूतनीकरणासाठी प्रस्‍तावांपैकी २ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. याशिवाय इतर विषयांसाठी ११ प्रस्ताव आले असून १ प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. एका प्रस्तावांसाठी चाळीसगाव येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. पी. भामरे यांच्या दालनात ही बैठक झाली. या वेळी माहिती अधिकारी मिलिंद दुसाने, अॅड. संभाजी जाधव, डॉ. हितेंद्र भोळे, रमेश पाटील, डॉ. जयंती चौधरी यांची उपस्थित होते.

Check Also

youth-festival

उमविचा युवक महोत्सव रंगणार जानेवारीत

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युवारंग युवक महोत्सवाचे आयोजन १९ ते २३ जानेवारी या दरम्यान धनाजी नाना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *