facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / नोटवर झालेल्या बंदी मुळे महिलेची आत्महत्या
2016-11-10suicide_ns

नोटवर झालेल्या बंदी मुळे महिलेची आत्महत्या

तेलंगणा, दि. 10 –
नोटा बंद करण्याचा निर्णय आल्यापासून आपल्याकडे असलेल्या नोटा आता रद्दी झाल्या या विचाराने महिला चिंतेत होती.  500 आणि 1000 रूपयांच्या नोटा बंद केल्यामुळे देशभरात नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. दरम्यान, तेलंगणामधून एक हैराण करणारी बातमी आली आहे. येथे एका 55 वर्षाच्या शेतकरी महिलेने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचं वृत्त आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणाच्या महबूबाबादयेथील शनिगापुरम गावात राहणारी कंडुकुरी विनोदा आणि तिचा पती उपेन्द्रिया यांनी तीन महीन्यापुर्वी 12 एकर जमीन विकली होती त्याबदल्यात त्यांना 55 लाख रूपये रोख मिळाले होते. त्यांना नवी जमिन खरेदी करायची होती त्यामुळे त्यांनी पैसे बॅंकेत जमा करण्याएवजी घरात ठेवले होते.  नोटा बंद करण्याचं वृत्त आल्यानंतर दोघा पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं होतं असं महिलेचा मुलगा श्रीनिवासने सांगितलं. विनोदा शेतकरी होती आणि तिचं शिक्षण कमी झालं होतं. नोटा बदलण्याच्या उपाययोजनांबाबत तिला काही माहित नव्हतं आणि आपल्याला मोठं नुकसान झालं असा तिचा समज झाला. स्थानिक पोलिस या घटनेची पुढील चौकशी करत आहेत.

Check Also

pal

पाळणाघरांची दोरी आता सरकारच्या हाती‌‌

खारघरमधील पाळणाघरात मुलीला अमानुष मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने शुक्रवारी महत्त्वाची घोषणा केली. आता राज्यातील सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *