facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / पैसाचा तुटवडा मुळे आजपण ATM बंद
atm_bank

पैसाचा तुटवडा मुळे आजपण ATM बंद

मुंबई :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बंद केल्याचे जाहीर केल्यानंतर बुधवारी देशभरातील सर्व एटीएम बंद होते. आज एटीएम सुरु होतील, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती, परंतु आजही बरेचसे एटीएम बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर केवळ, 100, 50, 20, 10, 5, 2 आणि 1 रुपयांच्या नोटाच चलनात आहेत. शिवाय नोटा एटीएममध्ये अजून सर्क्‍युलेट झालेल्या नाहीत. परिणामी 100 रुपयांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बहुतांश एटीएम आज बंद आहेत.

बॅंक आणि पोस्ट ऑफिसमध्ये आजपासून पाचशे, हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. पण एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला आणखी एक दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण बहुतांश एटीएम आज बंद आहेत.

एटीएम बंद असल्याने बॅंकांमध्ये तुफान गर्दी होण्याची शक्‍यता आहे. बॅंका लवकर उघडतील म्हणून लोकांची गर्दी केली आहे. मात्र जास्त रक्कम काढू नका, आवश्‍यक तेवढेच पैसे काढा, असे आवाहन बॅंकेकडून करण्यात आले आहे.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *