facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / Featured / काळा पैसा पांढरा करण्याचे तिकीट!

काळा पैसा पांढरा करण्याचे तिकीट!

आवाज न्यूज नेटवर्क –

 मुंबई – काळ्या पैसा पांढरा करण्याच्या पर्यायात देशभरातील सर्वाधिक लांब अंतरावरील प्रतीक्षायादीतील रेल्वेतिकिटे काढून नंतर ती रद्द करण्याचा गोरखधंदा तेजीत आला आहे. अशातच, रेल्वेने त्यावर चाप बसवण्याऐवजी ही तिकिटे रद्द करण्याचा परतावा चेक वा ईसीएसच्या स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे काळा पैसा अधिकृतरित्या पांढरा करण्याचे साधनच उपलब्ध केल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. भारतीय रेल्वेच्या या विचित्र निर्णयामुळे काळ्या पैसा अधिकृत करणाऱ्यांना मोकळे रान मिळाल्याचा दावा केला जात आहे. या निर्णयामुळे कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा पांढऱ्या पैशात रूपांतरित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

केंद्राने ५००, १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर काळ्या पैशास अधिकृत करण्यासाठी रेल्वेचा आधार घेतला जात आहे. त्यातूनच सर्वाधिक दूरच्या अंतरावरील पहिल्या वर्गाची प्रतीक्षा यादीवरील तिकिटे काढली जात आहेत. ही तिकिटे रद्द केल्यावर केवळ एक टक्का रक्कम कापून घेतली जाते. एका तिकिटावर सहा जणांची तिकिटे काढण्याची मुभा आहे. त्याचा गैरफायदा घेत देशभरात मोठ्या प्रमाणात ही युक्ती वापरात येत आहे. त्यावर नियंत्रण आणण्याऐवजी रेल्वेने १० हजार रुपये मूल्य असलेली तिकिटे रद्द केल्यानंतर ती रक्कम रोख रक्कमेच्या रूपात न देण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. नव्या निर्णयानुसार ही रक्कम परताव्याच्या रूपाने संबंधित प्रवाशांच्या बँक खात्यात चेक वा ईसीएसच्या रूपाने जमा केली जाणार असल्याचे आदेश काढले आहेत.
हा आदेश म्हणजे काळ्या पैशांची धन करणाऱ्यांना मुक्त दरवाजे असल्याची छुपी चर्चा सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून या पद्धतीने देशभरात तिकिटे काढण्याची अहमहिका सुरू आहे.

ही पद्धत लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने सकाळी प्रतीक्षायादीतील तिकिटांची विक्री केली जाणार नसल्याचे जाहीर केले. पण, सायंकाळच्या सुमारास हा निर्णय मागे फिरवण्यात आल्याने तिथेही लांब पल्ल्यांच्या मार्गावरील तिकिटांसाठी झुंबड उडाली आहे.

एका दिवसात चार कोटी!

रेल्वेच्या तिकीट विक्रीतही वाढ झाली आहे. त्यात प्रामुख्याने पहिल्या दर्जाच्या एसी तिकिटांचा समावेश आहे. ८ नोव्हेंबर रोजी देशपातळीवर सर्व तिकीट खिडक्यांवरील पहिल्या दर्जाच्या एसी तिकिटांची विक्री १८ लाख रुपये होती. ती संख्या ९ नोव्हेंबर रोजी ४ कोटी रुपयांवर गेली आहे. सेकंड एसीमध्ये ८ नोव्हेंबर रोजी १ कोटींचा महसूल ९ नोव्हेंबर रोजी पाच कोटींच्या आसपास गेला आहे.

तारीख तिकीट आरक्षित प्रवासी संख्या महसूल तिकीट रद्द परतावा

८ नोव्हेंबर २ लाख ७० हजार ५ लाख २१ हजार २६ कोटी ७ लाख रु. ४१,६८२ ३९ लाख ५८ हजार रु.

९ नोव्हेंबर ४ लाख ४० हजार ९ लाख २१ हजार ६४ कोटी ४ लाख रु. ७२,५७६ ५२ कोटी ९० लाख रु.

१० नोव्हेंबर २ लाख ४६ हजार ५ लाख ७ हजार ३३ कोटी २५ लाख रु. ३८,४७१ २ कोटी ९३ लाख रु

एसी तिकीट आरक्षण

तारीख पहिला दर्जा एसी एसी सेकंड एसी थर्ड

८ नोव्हेंबर २२०७ ३७,२४० १ लाख १२ हजार

महसूल ३९ लाख ८० हजार रु. ३ कोटी २७ लाख रु. ११ कोटी ६३ लाख रु.

९ नोव्हेंबर २७,२३७ ६९,९५० १ लाख ३५ हजार

महसूल १३.७४ लाख रु. १२ कोटी ६ लाख रु १३ कोटी १९ लाख रु.

१० नोव्हेंबर (दु. २पर्यंत)१०,८३२ ३५,८१६ ७३,०२२

महसूल ४७ कोटी ६१ लाख रु. ५८ कोटी ९१ लाख रु. ७५ कोटी १६ लाख रु.

मध्य रेल्वे पास विक्री

तारीख त्रैमासिक महसूल सहामाही महसूल वार्षिक महसूल

८ नोव्हें. ५,३६९ ४७ लाख ८७ हजार रु. १३९ २ लाख ८८ हजार रु. ५० लाख ८९ हजार रु

९ नोव्हे. ८.०५५ ७६ लाख ५९ हजार रु. ३८३ १८ लाख रु. ५१९ ३३ लाख ३८ हजार रु.

१० नोव्हें. २,५९५ २३ लाख ७५ हजार रु. २०६ ४ लाख ९४ हजार रु. १५३ ९ लाख ९० हजार रु.

पश्चिम रेल्वेपास विक्री

तारीख त्रैमासिक महसूल सहामाही महसूल वार्षिक महसूल

८ नोव्हें. ५,७५२ ५० लाख ७० हजार रु. २०८ ४३ लाख १५ हजार रु. ९८ ५ लाख ८१ हजार रु

९ नोव्हे. ९,४२२ ९० लाख १९ हजार रु. १,०५५ २६ लाख ३ हजार रु. १,०६४ ६३ लाख ३६ हजार रु.

१० नोव्हें. २,४९२ २८ लाख ८२ हजार रु. २८७ ६८ लाख रु. २५२ १६ लाख ९ लाख ९ हजार रु.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *