facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / काळा पैसा ‘रस्त्यावर’

काळा पैसा ‘रस्त्यावर’

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – लॉ कॉलेज रोड परिसरातील कांचन गल्लीतील विजयानंद बंगल्याजवळ एका प्लॅस्टिकच्या पिशवीत एक हजार रुपयांच्या ५२ नोटा फेकून देण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. महापालिकेच्या महिला सफाई कामगाराला या नोटा असल्याची पिशवी सापडल्यानंतर ती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. केंद्र सरकारने एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे नागरिकांकडून आपला काळा पैसा आता रस्त्यावर फेकण्यास सुरूवात केल्याचे दिसते आहे.
महापालिकेच्या सफाई कामगार शांताबाई सीताराम ओव्हाळ यांना ही एक हजार रुपयांच्या नोटा असलेली प्लॅस्टिकची पिशवी सापडली होती. या घटनेची माहिती खंडू लक्ष्मण कसबे (वय ५०, रा. तळजाई वसातह, पद्मावती) यांनी डेक्कन पोलिसांना दिली. डेक्कन पोलिसांनी या नोटा ताब्यात घेतल्या असून त्या सरकारी तिजोरीत जमा करण्यात येणार आहेत.
कसबे हे १९९२ सालापासून पुणे महानगरपालिकेत आरोग्य विभागात नोकरीस आहे. एसएनडीटी कॅनॉल कोठी येथे ते मुकादम म्हणून काम पाहतात. कसबे यांच्या अर्तंगत ३२ सफाई तसेच स्वच्छ सेवक आहेत. या सर्वांकडून प्रभाग क्रमांक ३६ मध्ये स्वच्छतेची कामे केली जातात. हे सर्व सकाळी साडे सहा ते दुपारी दीडच्या दरम्यान स्वच्छतेची कामे करतात.
कसबे यांना सफाई कामगार ओव्हाळ यांना गुरुवारी सकाळी फोन आला आणि त्यांनी कसबे यांना तत्काळ कांचन गल्लीत बोलावले होते. कसबे हे तेथे पोहोचले तेव्हा ओव्हाळ यांच्याजवळ एक प्लॅस्टिकची पिशवी होती आणि त्यात एक हजार रुपयांच्या नोटा होत्या. या नोटा खराब तसेच ओल्या झाल्या होत्या. ओव्हाळ यांनी ती पिशवी त्यांच्या एसएनडीटी कॅनॉल येथील कोठीत आणली होती.
ओव्हाळ या विजयानंद बंगल्याजवळ ओला आणि सुका कचरा वेगळा करत असताना त्यांना एका प्लॅस्टिकच्या पिशवीत एक हजार रुपयांच्या भरपूर नोटा आढलल्या होत्या. यातील बहुतांश नोटा हा गुंडाळी केलेल्या होत्या. ओव्हाळ यांनी ती पिशवी पाहिल्यावर त्या घाबरल्या आणि त्यांनी कसबे यांना फोन करून तेथे बोलावले होते.
कसबे यांनी कोठीत नोटांची पिशवी आणली तेव्हा तेथे लक्ष्मी खरात, कौशल्या गायकवाड, कमल जाधव, सोनाबाई कांबळे याही होत्या. दरम्यान, कसबे यांनी ही माहिती डेक्कन पोलिसांना दिली होती. डेक्कन पोलिस कोठीत धाव घेतली आणि नोटांसह सर्व लवाजमा प्रभात रोड पोलिस चौकीत गेला होता. पोलिसांनी पोलिस चौकीत या नोटा मोजल्या असता त्या ५२ असल्याचे आढळले होते.

कचऱ्याच्या पिशवीत नोटा सापडल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. ही रक्कम असलेली पिशवी अनावधनाने कचऱ्यात टाकली गेली असेल, किंवा प्रवासादरम्यान ही पिशवी पडली असेल, तसेच एक हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्यामुळे त्या जाणीवपूर्वक टाकली गेल्या असण्याची शक्यता आहे. तरीही ही रक्कम कोणाची असल्यास त्यांनी डेक्कन पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

अजय कदम

वरिष्ठ पोलिस निरीक्षक, डेक्कन पोलिस ठाणे

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *