facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / जुन्या नोटा घ्या आणि नव्या द्या

जुन्या नोटा घ्या आणि नव्या द्या

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्रीपासून ५०० आणि हजार रुपयांच्या नोटी चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर अंतर्गत कामकाजासाठी बँका बुधवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या. बाद करण्यात आलेल्या नोटा बँकेतून बदलून मिळणार असल्याने गुरुवारी बँका सुरू झाल्यानंतर तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये गुरुवारी सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती. अकोले, राजूर, कोतूळ, समशेरपूर या मुख्य शहरांतील बँकेत शेतकरी, व्यापारी, महिला, विद्यार्थी यांची संख्या लक्षणीय होती. रोजच्या गर्दीपेक्षा पाचपट गर्दीमुळे बँकांच्या बाहेरही रांगा दिसत होत्या. गर्दीवर नियंत्रणासाठी काही ठिकाणी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

अकोले तालुक्यात काही चाकरमानी दीपावलीसाठी आले गावी आले होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच बँक एटीएममधून पैसे काढले होते; हजार, पाचशे रुपयांच्या नोटा काढल्या होत्या. परंतु, नोटा बाद करण्याचा निर्णय झाल्याने त्यांना परतण्यासाठी पैसे नसल्याने त्यांची अडचण झाली. माहेरवाशिणींचीही तिच स्थिती झाली होती. त्या नोटा बदलण्यासाठी त्यांनी बँकेत गर्दी केली होती. व्यापारी वर्गही नोटा घेऊन भरणा करण्यासाठी बँकेत रांगेत उभे होते.

कोट ः

सध्या बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून दोन दिवसांत पाच हजार ग्राहकांनी आपल्या जवळील पाचशे, हजारच्या नोटा जमा केल्या आहेत. भरणा अधिक आहे, त्यामुळे यंत्रणेवर ताण पडला असला तरी आम्ही सुरळीत सेवा देऊन ग्राहकांना लवकरच नोटा बदलून देऊ.

– उदय काळे, शाखाधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र, अकोले

चौकट ः

कोतूळमध्ये आजपासून मिळणार नव्या नोटा

अदिवासी जनतेच्या सोयीसाठी कोतूळमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा शुक्रवारपासून वितरित करण्यात येणार असल्याचे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी पवन गोळे यांनी सांगितले. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत कर्मचारी जादा काम करणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *