facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / झळ मोठ्यांच्या विवाहसोहळ्यांनाही

झळ मोठ्यांच्या विवाहसोहळ्यांनाही

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – पाचशे व हजारच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा काही राजकीय नेत्यांनाच फटका बसण्याची चिन्हे आहेत. येत्या महिनाभरात केंद्र व राज्यातील तीन नेत्यांच्या घरी विवाहसोहळे असून मोठ्या चलनी नोटा रद्द झाल्याने या नेत्यांनाही त्याची झळ बसणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कन्येचा, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्राचा तसेच काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या पुत्राचा विवाह आहे. राजकीय क्षेत्रात काम करताना राजकीय पुढाऱ्यांच्या संपर्कात सर्वच स्तरातील व्यक्तींशी संपर्क येतो. अशा अशा विवाह कार्यक्रमांना जमलेल्या गर्दीवरून संबंधित राजकीय पुढाऱ्याचे राजकीय वजन तोलले जात असल्याने अधिकाधिक गर्दी जमविण्याकडेही अनेकांचा कल असतो.

अशा सोहळ्यांसाठी आकर्षक सजावट, रोषणाई, उत्तम प्रकारचा जेवणाचा मेनू, फुलांची सजावट, कॅटरर्स, मैदान तसेच कामगारवर्ग यांना बऱ्याचदा रोखीने पैसे द्यावे लागतात. मात्र केंद्र सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्याने या नियोजित सोहळ्यांत काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

नितीन गडकरी यांची कन्या केतकी, माणिकराव ठाकरे यांचा पुत्र राहुल, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचा पुत्र खासदार श्रीकांत यांच्यासह शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा पुत्र चिन्मय यांचा विवाहसोहळा येत्या काही दिवसांत होणार आहे. या लग्नांना सामान्य कार्यकर्त्यांपासून ते पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्रिमंडळातील सदस्य तसेच सरकारी अधिकारी यांची उपस्थिती असेल. याशिवाय काही आमदारांचे तसेच महत्त्वाच्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्याही कुटुंबातील सोहळेही पार पडणार आहेत. मात्र चलन समस्येतून काही ना काही मार्ग निघेल, असे या नेत्यांचे समर्थक सांगत आहेत.

महावितरण, बेस्टचा दिलासा

मुंबई : वीज देयके भरणाऱ्या ग्राहकांना महावितरण व बेस्टने दिलासा दिला आहे. महावितरण शुक्रवार, ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वीज देयके भरणा सुविधा देणार असून यासाठी ग्राहकांकडून पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. ज्या ग्राहकांची देयक भरण्याची मुदत ९ ते १४ नोव्हेंबर अशी आहे ती १५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. बेस्टच्या वीज देयक भरणा केंद्रावर प्रत्येक देयकावर चार हजार रुपयांपर्यंत ५०० आणि १०००च्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *