facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / पोस्टात आलेल्या नव्या नोटा दुपारीच संपल्या

पोस्टात आलेल्या नव्या नोटा दुपारीच संपल्या

आवाज न्यूज नेटवर्क –
औरंगाबाद – पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलण्यासाठी जुना बाजाराच्या मुख्य टपाल कार्यालयासमोर गुरुवारी मोठी गर्दी झाली. पोस्टातील रोख रक्कम दुपारी अडीचच्या सुमारास संपली. त्यामुळे नागरिक व कर्मचारी यांच्यात वादावादीही झाली. गर्दी वाढल्यामुळे टपाल खात्याने पोलिसांची मदतही मागविली होती.
केंद्र शासनाने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नागरिक पोस्टात जुन्या नोटा जमा करण्यासाठी आले. पोस्टाच्या गेटबाहेर सकाळी सातपासून नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. दहा वाजता टपाल कार्यालय सुरू झाल्यानंतर गर्दी होऊ नये म्हणून पहिल्या सत्रात दहा-दहा नागरिकांना कार्यालयात सोडण्यात येत होते. दहा जणांच्या गटात बाहेरची व्यक्ती घुसल्यानंतर मागे उभे असलेले नागरिक आरडा-ओरड करीत होते. संताप वाढत असल्याने अखेर नागरिकांना टपाल कार्यालयाच्या आवारात प्रवेश देण्यात आला. प्रत्येकी चार हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यात येत होत्या. त्यासाठी आधार कार्ड किंवा त्यांच्या पॅन कॉर्ड नंबर देणे बंधनकारक होते. पोस्ट कार्यालयात खाते असलेल्यांनी दहा ते वीस हजारांपेक्षा अधिक रक्कमेचा भरणा केला. नोटा बदलण्याची प्रक्रिया दुपारपर्यंत सुरू होती. त्यानंतर टपाल कार्यालयातील रोख रक्कम संपली. अधिकारी जाणीवपूर्वक नोटा बदलून देत नसल्याचा आरोप काही जणांनी केला. त्यानंतर अनेकांनी अन्य बँकांकडे धाव घेतली.अन्य कार्यालयांत नोटा नाहीत
औरंगाबाद शहरातील; तसेच ग्रामीण भागातील पोस्ट कार्यालयातही अनेक जणांनी सकाळपासून रांग लावल्या होत्या. मुख्य टपाल कार्यालयात पुरेशा प्रमाणात नोटा देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अन्य टपाल कार्यालयांत नोटा पाठविण्यात आल्या नाहीत. त्याचा फटका ग्रामीण भागातील आणि शहरातील अनेक पोस्टाच्या कार्यालयात आलेल्या नागरिकांना सोसावा लागला.

मागितले ७० लाख, मिळाले ७ लाख!
पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी बँक ऑफ हैदराबादकडे ६० लाखांपेक्षा अधिक रक्कम देण्याची मागणी केली होती, मात्र एसबीएचने फक्त सात लाख रुपयांची कॅश पाठविली. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली, असे पोस्टाच्या सूत्रांनी सांगितले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *